Home महाराष्ट्र भीडे यांच्याविरोधात गंगाखेड पोलीसांत तक्रार

भीडे यांच्याविरोधात गंगाखेड पोलीसांत तक्रार

191

🔹म. गांधी बद्दलच्या वक्तव्यावरून संताप 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29जुलै):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबतीत संभाजी भीडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यात आज फिर्याद देवून भीडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. गंगाखेड कॉंग्रेस आणि भारपच्या वतीने ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या अपप्रवृत्तीस वेळीच न रोखल्यास आंदोलन करण्याचा ईशारा या प्रसंगी देण्यात आला.

गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, भाकपचे तालुका सचिव ओंकार पवार, योगेश फड, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सिद्धार्थ भालेराव, भाई गोपीनाथ भोसले, रोहीदास लांडगे, अशोक जाधव आदिंनी आज ही तक्रार दाखल केली. पोलीस ऊपअधिक्षक दिपक टीपरसे, पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे आदिंशी चर्चा करत संभाजी भीडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. सदर प्रकरणी विधानसभेत चर्चा झालेली असून वरीष्ठ पातळीवरून यासंदर्भात निर्णय अपेक्षीत आहे. तो होताच स्थानिक पातळींवर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पोलीस ऊपअधिक्षक टीपरसे, पो. नि. वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here