✒️अकोला(पिरोगामी न्युज नेटवर्क)
अकोला(दि.28जुलै):-विदर्भातील नरेंद्र इंगळे यांचे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व संघटनेतील क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता पॅंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक राष्ट्रीय अध्यक्ष चेतन भाऊ इंगळे यांच्या आदेशानुसार नरेंद्र इंगळे यांना विदर्भ अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच संघटनेचे पुढील धैर्य धोरण तसेच बहुजन समाजाला मान सन्मान न्याय हक्क व अधिकार मिळून देण्यासाठी कार्य करावे असे संघटनेतील पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष चेतन भाऊ इंगळे यांनी आव्हान केले लोकशाही मार्गाने तसेच भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून सामाजिक जनहित राष्ट्रहित प्रयत्न असे नरेंद्र इंगळे यांनी सांगितले