🔺नदीच्या मध्यभागातून रेतीचा उपसा करून पाण्याचा प्रवाह मधोमध करण्यात यावा – शेतकरी
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 28 जुलै):- तालुक्यातील मौजा पिंपळगाव भोसले हे गावातून वैनगंगा उपनदी वाहते. परंतु वारंवार रेतीचा लिलाव होऊन रेतीचा अवैध उपसा केल्यामुळे पाण्याचा प्रवाह एकाच शेतीच्या दिशेने येऊन अनेक शेतकऱ्यांची स्व.मालकीची शेतजमीन नदीपात्रामध्ये लुप्त झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची विहीर सुद्धा नदीपात्रात गेली, उर्वरित राहिलेली जमीन त्या जमिनीवर जाण्यासाठी रस्ता नाही,सातबारा असून शेती नाही अशी वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आणि अशा वारंवार येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांची पूर्णता जमीन पुन्हा पुन्हा जाईल व तो शेतकरी भूमीहीन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.
चार ते पाच वर्षात अनेकदा संबंधित अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले परंतु कोणीही आतापर्यंत चौकशी करण्याकरिता आले नाही. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की नदीच्या मध्यभागातून रेतीचा उपसा करून पाण्याचा प्रवाह मधोमध मधून करण्यात यावा किंवा ग्रामपंचायत पिंपळगाव भोसले यांनी यावर्षी रेती घाट लिलाव घेऊन. त्या भागातील रेती उत्खनन करण्यात यावी अशी मागणी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी गावातील शेतकरी शरद शेबे बाळकृष्ण शेबे, हरिभाऊ शेबे, प्रभाकर शेबे ईश्वर शेबे, माणिक शेबे, लालाजी शेबे नामदेव शेबे, अनिल पिलारे, राजू राऊत शालिकराम मोहुर्ले, नारायण मोहूर्लै, लालाजी दोनाडकर, गौतम मेश्राम, जयपाल मेश्राम, प्रफुल कुथे तोताराम बन्सोड, केवळ बन्सोड , मुखरू बन्सोड उपस्थित होते.