✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)
चिमूर(दि.28जुलै):-बहुजन समाज पार्टी चिमुर विधानसभा क्षेत्राच्या वतीने दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता चिमुर येथील आशिर्वाद सभागृहात बसपा कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी बसपा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भिमजी राजभर राहणार आहेत.
यावेळी विशेष मार्गदर्शक म्हणुन बसपा प्रदेश अध्यक्ष अॅड. संदिप ताजणे, प्रदेश प्रभारी अॅड. सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा चिमुर विधानसभा प्रभारी सुशिल वासनिक, बसपा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुकदर मेश्राम, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चिमुर विधानसभा बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष महेंद्र बारसागडे यांनी या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी देशभर अविरत संघर्ष करणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांच्या मार्गदर्शनानुसार चिमुर विधानसभेमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकांची पुर्वतयारी म्हणुन संघटन समिक्षा तथा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी बिव्हीएफ, बामसेफ, सेक्टर पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत. दरम्यान प्रसिध्द गायक गोकुल सिडाम यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात बहुजन समाजातील कार्यकर्त्या व नागरिकांनी तन मन धनाने सहकार्य करून सहभागी व्हावे असे आवाहन बारसागडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन चिमुर विधानसभा क्षेत्राचे बसपा उपाध्यक्ष सचिन लभाने, महासचिव विनोद राउत, कोषाध्यक्ष संजय पाटील, सचिव कवडु निकेसर, बिव्हीएफ संयोजक दिगंबर गणवीर, भुमेश खोब्रागडे, चिमुर सेक्टर अध्यक्ष सुरेश मेश्राम आदीने केले आहे.