Home अमरावती कै.मैनाबाई बा.बुंदेले समाजसेवा गौरव पुरस्काराच्या विजेत्या डॉ. उज्ज्वला मेहरे यांचे कार्य प्रेरणादायी-...

कै.मैनाबाई बा.बुंदेले समाजसेवा गौरव पुरस्काराच्या विजेत्या डॉ. उज्ज्वला मेहरे यांचे कार्य प्रेरणादायी- प्रा.श्रीकृष्ण बनसोड

148

 

अमरावती ( वार्ताहर )
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर सभागृह,राधानगर येथे प्रा. डॉ. सौ. उज्ज्वलाताई सुरेशराव मेहरे (माळोदे )यांना कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे ” कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार -2023 ” हा पुरस्कार अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रमुख अतिथी प्रा.गीताताई मडघे, माजी ए.पी.आय.भगवान बाबारावजी बुंदेले, प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, पुरुषोत्तम वनसकर, प्रा. एन. आर. होले, पाचखंडे गुरुजी, श्रीकृष्णदास माहोरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, गौरवचिन्ह,विद्रोही महात्मा व अभंग तरंग ही पुस्तके देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत शिरोमणी गुरू रविदास महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, समाजसेविका कै. मैनाबाई बुंदेले, आदर्श नारसेवक कै. बाबारावजी बुंदेले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
राष्ट्रसंतांच्या राष्ट्रवंदनेनंतर कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभंगकार प्रा. अरुण बा.बुंदेले यांनी ” राष्ट्रसंत ” या स्वरचित अभंगाचे गायन करून प्रास्ताविक भाषणातून मातोश्री कै.मैनाबाई आणि वडील कै. बाबारावजी यांच्या समाजसेवेच्या कार्याची माहिती देऊन माझे व्यक्तिमत्त्व मातापित्यांच्या सुसंस्कारामुळे कसे घडत गेले हे सांगून आई – वडिलांचे ऋण आपण सात
जन्मही फेडू शकत नाही. त्यांचे ऋण फेडण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे.माझ्या मातोश्रीच्या नावाने डॉ. उज्ज्वलाताई मेहेरे यांना दिल्या केलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो “असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची लेक डॉ.उज्ज्वलाताई मेहरे यांचे महिला प्रबोधन व सक्षमीकरण त्यांच्या संघटन बांधणीतील कार्य हे प्रेरणादायीआहे. त्या सामाजिक, शैक्षणिक चळवळीला गतिशील करीत आहेत.त्यांनी जीवनवादी भूमिकेतून नानाविध विधायक क्षेत्रात प्राण ओतला. त्यांना आज प्रदान करण्यात आलेला ” कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले समाजसेवा गौरव पुरस्कार ” त्यांना पुढील कार्याची प्रेरणा देईल.” असे विचार व्यक्त केले.
प्रमुख अतिथी प्रा.गीताताई मडघे यांनी, “कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठानच्या विविधांगी विधायक उपक्रमांचे कौतुक करून प्रतिष्ठानचे कार्य अभिनंदनीय असल्याचे सांगून या कार्यक्रमातून प्रा.अरुण बुंदेले यांचे आई वडिलांवरील प्रेम दिसून येते.असे मधुर प्रेम प्रत्येकाने आई वडिलांवर केले पाहिजे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सेवारत डॉ.उज्ज्वला मेहरे यांना या पुरस्काराने समाजकार्याची ऊर्जा मिळेल.”
प्रमुख अतिथी माजी ए.पी. आय. भगवान बुंदेले यांनी ,” माझी आई कै.मैनाबाईच्या नावाने दिल्या गेलेल्या या पुरस्काराच्या सोहळ्यातून आई वडिलांच्या समाजसेवेच्या कार्याला उजाळा मिळाला असून प्रतिष्ठानचे हे कार्य माझा धाकटा बंधू प्रा.अरुण या पुढेही अशा कार्यक्रमातून आई वडिलांचे नाव सर्व दूर पोहोचवेल. तसे त्याचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्य सुरू होतेच त्याला आता प्रतिष्ठानची सोबत मिळाल्यामुळे तो हे कार्य अधिक वृद्धिंगत करेल असे वाटते.
प्रमुख अतिथी पुरुषोत्तम
वनस्कर यांनी ,” समाजप्रबोधन कर्ते, साहित्यिक, कवी अशा व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले प्रा. बुंदेले यांचे आई-वडिलांवर असलेले प्रेम पाहून मी आज भारावून गेलो. समाजामधील हे समाजभूषण व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या आईच्या नावाने समाजसेवा पुरस्कार देऊन डॉ. उज्ज्वलाताईचा जो येथे सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी केला त्यावरून त्यांच्या प्रतिष्ठानचे कार्य इतरांनाही प्रेरणा देणारे आहे,असेच म्हणावे लागेल.”
प्रमुख अतिथी पाचखंडे गुरुजी यांनी ,” स्वतःच्या आई-वडिलांवर प्रेम करण्याची प्रेरणा प्रा.बुंदेले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.उज्वलाताई मेहरे यांना आईच्या नावाने दिलेल्या पुरस्कार सोहळ्यातून इतरांना मिळेल. स्वतःच्या आईच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून त्याद्वारे ते करीत असलेले सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्य प्रशंसनीय आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ.उज्ज्वला मेहरे यांनी ,” महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन व सर्व शाखीय माळी महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करताना सात्विक आनंद मिळत असल्याचे सांगून कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानची कृतज्ञता व्यक्त करून प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सौ.नंदा बनसोड, सौ. सुनंदा आखरे, डॉ.एस.डी. जावरकर, महादेव तायवाडे, मधुकर आखरे, सुरेशराव मेहरे, विश्वास डहाके, बाळासाहेब झोड, नारायण भाटी, डॉ.योगेश्वर गायकवाड, एकनाथ महल्ले, ज्ञानेश्वर वानखडे, श्याम झनके, विजय मेहरे, पी. बी. वानखडे,वसंतराव सुळे,विनोद नानोटकर, विनायक रोडे, चंद्रकांत बकाले, संजय तायवाडे, महादेव तायवाडे, रामदास गायकवाड, अल्हाद मेहरे, सौ.प्रतिभा जावरकर, अनुराधा वाठ, लता बकाले, निर्मला पाचघरे, मंदा गायकवाड, त्रिवेणी महल्ले, सुप्रिया मेहरे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान, गुरु रविदास सामाजिक व साहित्यिक संशोधन संस्था, श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था, उपेक्षित समाज महासंघ,सर्व शाखीय माळी समाज संघ, ऋणानुबंध परिचय महामेळावा आयोजन समिती, डॉ.आंबेडकर समाज भूषण संघटना, वऱ्हाड विकास परिवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने डॉ.उज्ज्वला मेहरे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व अभिष्टचिंत करण्यात आले.
याप्रसंगी फुले-शाहू – आंबेडकरी संघटना व सर्व संघटनांच्या वतीने मणिपूर राज्यात आदिवासी महिलांची विवस्त्र करून धिंड काढणाऱ्या व सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याची तसेच केंद्र सरकारने मणिपूर राज्यात त्वरित राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली.
संचालन स्मिता संजय घाटोळ तर आभार प्रा. एन.आर.होले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here