जीवनाच्या कर्मव्यस्ततेतून मनुष्याची सुटका नसते.प्रत्येक जीवाला मी कोण आहे ? माझा जन्म का आणि कश्यासाठी झाला आहे ? माझं जीवनाचं मुख्य आणि अंतिम ध्येय/उद्दिष्ट काय आहे ? या गोष्टी जाणून घेऊन जीवनात सकारात्मक बदल घडवून जीवन आनंददायी बनऊन जगले पाहिजे.परमात्म्याने दिलेलं काम योग्य आणि यथोचित पार पाडून जीवनाची नौका सुरक्षित पार भवसागरातून पार पाडायला पाहिजे.प्रत्येकाला दुसऱ्याचं काम सोप्प वाटत पण तसं मुळीच नसतं कोणतच काम छोट किंवा मोठ नसतं ते प्रामाणिकपणे पार पाडणे हाच आपला धर्म आहे .प्रत्येक धर्मात कर्माला खूप महत्त्व आहे फळाची इच्छा न करता केलेले कर्म मानवसेवेला सत् कर्मी लागते. गेल्या पंधरा वर्षांपासून च्या रुग्ण सेवेला अविरतपणे न्याय देतो आहे .खूप समाधान आहे खूप ठिकाणच्या लोकांना कायमच वेदनामुक्त केलं आहे .त्यांना दिलेल्या वेदना मुक्तीचा महातानंद गगनात मावेना झाला आहे.
मला वाटेला आलेले हे सेवेचे व्रत मी अतिशय प्रामाणिकपणे पूर्णत्वास घेऊन जात आहे याचा सार्थ अभिमान असून .शहरी भागात भरगच्च पैशापेक्षा ग्रामीण भागातील लोकांचं प्रेम आणि त्यांची सेवा मला कायम आकर्षित करते . पिंपळनेर सारख्या डोंगराळ ग्रामीण भागात लोकांची सेवा करतो आहे याचा मनोमन आनंद.लोकांना ग्रामीण भागात वेदनामुक्त,भयमुक्त आणि रोगमुक्त करताना आलेले बरेवाईट अनुभव जीवनाचा अर्थ सांगून जातात कोणाला पैशाचा अभाव तर कोणाला सोबतीचा अभाव असतो ,कोणी अनाथ तर कोणी गरीब असतं ,कोणाला पैसे बुडवण्या ची लत असते कोणाला खोटं बोलण्याची आणि बदनाम करण्याची तर कोणी प्रामाणिकपणे ,सुंदर व्यवहारी परिजन असतात या सर्वांना अगदी हातोटी ने तोंड देत गेल्या पंधरा वर्षांपासून रात्रंदिवस आरोग्यसेवा देत आहे आपल्या या सेवेला नेहमी न्याय देऊन काम करणार हेच माझं अंतिम जीवनाचं ध्येय असेल..
✒️मा.सम्राट डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर