✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
महागाव(दि. 23 जुलै):- तालुक्यातील आनंदनगर येथील नागरिक पुराच्या पाण्यामुळे गावातील 90 पेक्षा जास्त लोक अडकून पडले होते.त्या ठिकाणची समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी प्रत्यक्ष हजर राहून प्रशासनाला कामाला लावले.ढगफुटीमुळे महागाव मध्ये पाणीच पाणी झाले होते.आणि काही कुटुंब त्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते.त्यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर ची प्रशासनाने व्यवस्था करून त्याचबरोबर बोटीची ही व्यवस्था केली होती.
या ठिकाणी ची साहेराव कांबळे यांनी सर्व परिस्तिथी ची पाहणी करून पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचला पाहिजे…! कोणतीही जिविन हानी होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकर्ते सह त्या ठिकाणी तळ ठोकून बसले होतो.प्रशासनाने सर्व पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.यावेळी जिल्हा अधिकारी अमोल येगडे,साहेबराव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), दीपक दिवेकर (पटवारी), डॉ.अंकुश देवसरकर, अविनाश खंदारे तसेच प्रशासनाचे अनेक अभिकरी उपस्थित होते.