Home महाराष्ट्र धरणगाव माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !….

धरणगाव माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !….

86

🔸सा.मा.स.सु.पंचमंडळाने केला १०० गुणवंतांचा ग्रंथ व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार !….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.23जुलै): येथील मोठा माळीवाडा सावता माळी समाज सुधारणा पंच मंडळाच्या वतीने समाजातील इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत ७५ व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या व उच्च शिक्षणात यश मिळविणाऱ्या एकूण १०० विद्यार्थ्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

अल्पवयात इंग्रजी कविता संग्रह (inner mind of a blooming girl) प्रकाशित केल्याबद्दल कु. देवश्री महाजन, पोष्टात नोकरी लागलेल्या कुंदबाला नरेंद्र पाटील, निकिता सुभाष महाजन, रेल्वेत नोकरी लागलेल्या भावेश रवींद्र महाजन, राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी झालेल्या भावना दशरथ महाजन ह्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक व धरणगाव प्रवासी मंडळाचे सचिव एस.डब्ल्यू.पाटील, प्रमुख अतिथी म्हणून मोठा माळीवाडा पंच मंडळाचे अध्यक्ष विठोबा महाजन, लहान माळीवाडा पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, शिवसेना (उबाठा) सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर महाजन, समाजाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सत्कारमूर्ती देवश्री महाजन, भावना महाजन, वर्षा महाजन, आबासाहेब वाघ यांनी मनोगत व्यक्त करून समाजाचे आभार मानले. अभिजीत पाटील, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात एस डब्ल्यू पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराच्या संधी स्वतःसाठी उपलब्ध करून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाला पालक वर्ग विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रस्तावना आर.डी. महाजन यांनी केली. सूत्रसंचालन समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी व आभार समाजाचे सचिव गोपाल माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोपाल सिताराम महाजन, चोपदार कैलास महाजन, निवृत्ती महाजन, मनोज महाजन, लोकेश महाजन व सर्व पंच मंडळाने मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here