✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-907591311
केज(दि.23जुलै):- बीड रोडवर मस्साजोग जवळ चारचाकी आणि मोटारसायकलीचा जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रविवारी घडलेल्या या घटनेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, रविवार (दि. २३) दुपारी १ वाजताच्या सुमारास केज बीड रोडवर मस्साजोग येथील पेट्रोल पंपाजवळ एका मोटार सायकलीला (क्र. एमएच २४ एव्ही ८७३७) भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीने (क्र. एमएच २० ईवाय ३३४०) जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकली वरील एकाचा मृत्यू झालेला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
अपघातातील मयताची व जखमींची ओळख पटलेली नसून दोघांनाही केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शमीम पाशा आणि वाघमारे हे घटनास्थळी हजर झाले.