✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.23जुलै):- शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज दिनांक 23/07/2022 रोज रविवारी बैठक होती.याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची सभा उधळून लावली, याच वेळी पोलिसांनी जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले व सुटका केली.यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असून नुकतेच महाराष्ट्र व संपूर्ण भारताची बदनामी केली. संभाजी भिडे हे देशद्रोही असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.दरम्यान चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती.
याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अग्रसेन भवन परिसरात जाऊन जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांची सभा उधळून लावली.त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले व सुटका केली आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, भिम आर्मी चे तालुका अध्यक्ष अमर धोंगडे,शहर अध्यक्ष शशिकांत निरांजने, बबलू करमरकर,रोहन कळसकर,प्रदीप झामरे, गौतम रामटेके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.