Home महाराष्ट्र गृहस्थाश्रमातून वृध्दाश्रमाकडे – भविष्यातील गरज- गिरीष देशपांडे यांचे मनोगत !!

गृहस्थाश्रमातून वृध्दाश्रमाकडे – भविष्यातील गरज- गिरीष देशपांडे यांचे मनोगत !!

143

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.23जुलै):- खूप वेगळा असा विषय आहे. पूर्वी आपल्या इतिहासकाळात समाजात आपले प्रापंचिक जीवन जगून झाल्यावर पुढील पिढीकडे कुटुंबाची सूत्रे सुपूर्द करून वनात म्हणजेच जंगलात जायची परंपरा होती त्याला वानप्रस्थाश्रम असे म्हणायचे. तेंव्हा जंगले होती म्हणून वन म्हणायचे. आधुनिक काळात सिमेंटची जंगले आहेत. शुद्ध हवा, चांगले वातावरण, चुलीवरचे जेवण, सकाळच्या शुद्ध हवेत प्रभातफेरी, योगासन,प्रायायाम इत्यादी शहरी भागात शक्य नाही.

आपल्या घरातील चुली आपण बंद केल्या आणि चुलीवरचे जेवण कुठल्या हॉटेल मध्ये मिळते का..? याचा शोध आपण आपल्या चारचाकी गाडीत बसून महामार्गावर घेत असतो. लहानपणी साईकल मिळावी म्हणून आकाशपाताळ एक करायचो आता तीच सायकल चालविण्यास आपण जिम जॉईन करतो. घरातील पोळीवर भाजी घालून गुंडाळी करून खायचे सोडून बाजारात आपण तोच प्रकार Franky म्हणून 50/ रुपयाला घेण्यात आनंद मानतो.घरी लहानपणी त्याच पोळीभाजीची गुंडाळी आई आपल्याला डब्यात टाकून द्यायची.

नवीन पिढीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना मोकळीक देणे गरजेचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.सायकल चालविण्यास मुलांना शिकवताना आपण कायम त्यांच्या सीटच्या मागे धरून पळू शकत नाही. त्यांना सोडवेच लागते. एक दोन वेळा पडतील,धडपडतील, घुडगा फुटेल, रक्त येईल,जखम होईल पण त्याची त्याला सवय झाली तरच तो शिकेल.

*Actually काय होतंय माहिती आहे का .. ,,? आपण आपल्या पाल्यांना अती माया,प्रेम करून त्यांना अपंग बनवीत आहोत.त्यांना प्रत्येक गोष्टीत आपली मदत लागते कारण आपण त्यांचे स्वतंत्र अस्तित्व होण्यासाठी प्रयत्न केलेच नाही* .

मृत्यू समयी आपणास काहीही वर नेता येत नाही. सर्व खालीच राहणार आहे. ठेवून जा नाहीतर देवून जा असे फक्त दोन पर्याय असतात. हे तत्वज्ञान सर्वांना माहीत आहे. मग प्रेम, माया, ममता,आपुलकी,संपत्ती,घर, गाडी, बंगले याचा हौस आपण का बाळगतो ? त्यापेक्षा मस्त निसर्गाच्या सानिध्यात वृध्दाश्रम का निवडत नाही. पूर्णपणे निरपेक्ष भावनेने आपण मृत्यूकडील उर्वरित प्रवास का सुरू करू शकत नाही.

पृथ्वीवर आलो एकला, जाणार एकला. मध्ये भेटलेले नातेवाईक, बायको, मुले, मित्र हे काही स्टेशन्स होती.थोडा वेळ विश्रांतीसाठी असे आपण म्हणू शकतो.पण त्यात न अडकता तटस्थपणे जर विचार केला तर आयुष्याची सायंकाळ आपण निसर्गाच्या सान्निध्यात एका छान वृद्धाश्रमात आपली सोय का बघू नये…?

जिथे आपण आपल्या वयाच्या समवयस्क लोकांसोबत राहून जीवन व्यतीत करू शकतो.

नोकरी, व्यवसाय, धंदा, राजकारण, महागाई, सोसायटीच्या कटकटी नसतील,पार्किंग वरून भांडणे नसतील, नगरसेवक काय करतो, आमदार,खासदार काम करतो की नाही ही चिंता नसेल,कचरा उचलला जात नाही ही भानगड नसेल….

आपण जन्माला येण्यापूर्वीही हा समाज,राष्ट्र,देश,प्रशासन,सरकार, मिलिटरी,सेना इत्यादी हे सर्व होते. आपण जन्माला आलो,आपला उद्धार केला,आता आपण गेल्यावर समाज, देश,राष्ट्र यावर काहीही फरक पडणार नाही. मग का आपण उतारवयात उगाच चिंता करत बसायचे. *आपल्या मृत्यू नंतर चार दिवस दुखवटा,तेरावा झाल्या नंतर प्रॉपर्टी विभाजन, एक महिन्यानंतर अरेरे……अमुक अमुक गेले का…..खूप वाईट झाले….चांगले होते. फक्त हेच* *होणार* .

मागील 12 वर्षा पासून आश्रम चालवताना हे अनुभव घेतले आहेत. त्यामुळे भविष्यात निसर्गाच्या सानिध्यात मुरबाड,कोकण व इतर ग्रामीण भागात आमचे अद्यावत आश्रम बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

आपल्या आवडी निवडी जोपासुया, धार्मिक कार्यात रममाण होऊया, आपले छंद वाढवीत मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने त्याचे स्वागत का करू नये..?

*मृत्यू एक अंतिम सत्य आहे,एक वास्तव आहे,एका जीवनकार्यावर मिळविलेला विजय असेल.मृत्यूचे स्वागत केले पाहिजे.तो एक आनंद सोहळा झाला* *पाहिजे.* सुटका या भूतलावरून, प्रस्थान एका वेगळ्या वाटेवरून, वेगळ्या जगात व वेगळ्या विश्वात…फ्लॅट संस्कृती सोडून मुक्त जीवन व्यतीत करून आपला शेवटचा काळ नामस्मरण करीत का घालवू नये.

मृत्यूनंतर दुर्गंधी येवून शेजाऱ्यांना समजण्यापेक्षा हे नक्कीच बरे असे मला वाटते.

आम्ही विविध प्रकारच्या योजना आखत आहोत.पण आर्थिक मदत असल्याशिवाय हे शक्य नाही. सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात आधुनिक वानप्रस्थ ही संकल्पना मी राबवू शकतो कारण माझ्याकडे माझी, संस्थेच्या मालकीची अडीच एकर जागा आहे. पण execution साठी आर्थिक पाठबळ गरजेचे आहे हे नक्की.

थोडक्यात काय तर मी जमिनीचा मालक आहे पण माझ्या स्वप्नातील आदर्श वानप्रस्थ आश्रम उभारण्यासाठी आर्थिक निधीची गरज आहे.12 वर्षाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे काय हवे,काय नको याची जाणीव आहे.

*काही लोक हा लेख वाचल्यानंतर मला पैशासाठी हा करतो आहे असे सुध्दा म्हणतील. बरोबर आहे त्यांचे. एवढे सर्व लोकांसाठी करावयाचे म्हंटले तर पैसे हे हवेच आहेत. पण हे सर्व मी कोणासाठी बांधत आहे याचा विचार सुध्दा आपण केला* *पाहिजे* . त्या विविध भागातील आश्रमात मी किंव्हा माझे कुटुंब राहणार नाही तर आपल्याच समाजातील वृध्द लोकांसाठी हे सर्व असणार आहे. चांगल्या सुविधा हव्या असतील तर त्यांना निर्माण करण्यासाठी पैसा हा लागणारच ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे.

*आपण बांधकामासाठी निधी देणगी स्वरुपात देवू शकता.थोडे जास्त पैसे असतील तर तीन,सहा, नऊ किंव्हा बारा महिन्यासाठी मुदत ठेव स्वरूपात संस्थेला देवू शकता. त्याचा योग्य आकर्षक परतावा आपणास दिला जाईल. आपले नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेवू.*

सदर बांधकाम सुरू झाले की आम्ही भविष्यासाठी बुकिंग सुध्दा घेणार आहोत. कारण दीड ते दोन वर्षे लागतील काम पूर्ण होण्यासाठी. लोक त्यांचे बुकिंग करून ठेवून शकतील.

*मी काम समाजसेवेचे करीत असलो तरी मी पूर्णपणे व्यवहारिक विचार करतो.*

माझे विचार तुम्हालाही पटतील असे मला वाटते.

अधिक माहितीसाठी श्री *गिरीष देशपांडे*, संस्थापक अध्यक्ष *देशपांडे फाऊंडेशन*, बदलापूर. जिल्हा – ठाणे यांना मोबाईल नंबर: *8600045385*, *9172647505* संपर्क करावा असे नम्र आवाहन !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here