Home महाराष्ट्र देशात लोकशाही जिवंत आहे का?-Is democracy alive in the country?

देशात लोकशाही जिवंत आहे का?-Is democracy alive in the country?

113

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेचे राज्य यावं यासाठी संविधान लिहिलं त्या मुळे जनतेचे राज्य आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पण देशात सध्या काही घटना घडू लागले आहे, ते पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही ते म्हणजे देशातील लोकशाही खरंच जिवंत आहे का?.

देशामध्ये गेल्या काही दिवसात आणि महिन्यात विविध धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. देशात घडलेल्या काही घटना उजेडात आल्या, प्रसिद्धी माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्या पण काही घटना मात्र नित्य नेमाप्रमाणे ‘तेरी भी चूप अनं मेरी भी चूप ‘ म्हणून त्याच ठिकाणी गप्प झाल्या. मणिपूर येथील गाढलेली घटना म्हणजे अतिशय भयंकर आणि मानवता धर्माला लाजवणारी घटना त्या घटना घडून कित्येक दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. तो पर्यंत काही संघटना, काही शिष्ठ मंडळाला आंदोनल करावे लागले. तेव्हा त्या गुंड प्रवृत्ती च्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही देखील खेदजनक बाब आहे, एवढ्या साऱ्या घटना समतेचे आणि जनतेचे राज्य असणाऱ्या भारत देशात अशी घटना घडते म्हणजे सर्व सामान्य जनतेला विचार करायला लावणारी आणि इथे लोकशाही आहे का? म्हणायला लावणारी गोष्ट आहे.

देशात अशा छोट्या मोठ्या घटना तर असंख्य घडत असतील, त्या मोजताही येणार नाहीत अशी या बोलक्या काही मोजक्या घटनावरून जाणवते. महाराष्ट्र राज्यातील एका जिल्ह्यातील ताजी घटना म्हटले तर, एका दलित समाजातील युवकाला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी का केली म्हणून जातीयवाद्यानी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. ही लोकशाही राष्ट्राला शोभनारी आहे हे देखील आजच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला सांगावे लागते असो….एवढंच नव्हे तर पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्र राज्यातील स्व. वसंतदादांच्या सांगली जिल्ह्यातील बेडग या गावी गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी भयानक घटना घडली, त्या घटनेने महाराष्ट्र राज्यातील दलित बांधवांच्याच नव्हे तर लोकशाही मानणाऱ्या संविधान मानणाऱ्या सर्वच महाराष्ट्र वासिय यांच्या भावना दुखावल्या.

ज्यांनी माणसांना माणूस म्हणून जगता यावं यासाठी रक्ताचं पाणी करून संविधान लिहिलं त्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची उभी राहत असलेली स्वागत कमान काही लोकांनी सुद्बुद्दीने पाडली, हे कृत्य करताना त्या काही मंडळींनी संविधान जनक, भारतरत्न, विश्व्भूषण यांच्या कर्तृत्वाचा जराही विचार का केला नसावा. असा प्रश्न लोकांना पडल्यावाचून राहणार नाही. हे प्रकरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंतत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला आता त्यातून पुढे काय होईल हे सांगणे उचित ठरणार नाही. परंतु बाबासाहेबांची उभी राहणारी कमान उभी कमान उभी राहण्याअगोदरच पाडली जाते ही घटनाच किती गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे अशा घटना देशात यापूर्वीही घडल्या असाव्यात परंतु त्याला वाचा फुटली नसावी. असो परंतु सध्या देशातील बहुतेक ठिकाणी महिलांवरील अन्याय-अत्त्याचार, दलितावरील अन्याय, अपंग, वंचित घटकांवरील अन्याय अशा स्वरूपाच्या घटना पाहिल्या तर देशात लोकशाही जिवंत आहे कां असा प्रश्न पडेल?.

✒️विश्वास मोहिते(कराड-सातारा)मो:-9763201056

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here