Home Breaking News पुसेगाव पोलिसांची कारवाई दोन लाख सात हजार किमतीच्या अकरा मोटारी केल्या जप्त

पुसेगाव पोलिसांची कारवाई दोन लाख सात हजार किमतीच्या अकरा मोटारी केल्या जप्त

110

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.23जुलै):-जिल्ह्यात दरजाई व दरूज ता. खटाव गावचे हद्दीत पाझर तलाव येथील सुमारे दोन लाख सात हजार किमतीच्या 13 वीजपंप व मोटर केबल, सेक्शन पाईप तोडून सुमारे 50 हजाराचे नुकसान केले बाबतची तक्रार श्री सतीश भगवान बोटे राहणार दरजाई, ता .खटाव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरून पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी भोसले साहेब यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली त्यावरून संशयित व्यक्ती श्रीरंग पाटोळे व सुशांत शिवाजी पाटोळे दोन्ही राहणार दरजाई तालुका खटाव जिल्हा सातारा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कुसुशीने तपास केले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी चोरून नेलेल्या 13 वीज शेतीपंपापैकी 11वीज मोटर शेतीपंप त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी दिली आहे.

तर या यशस्वी मोहिमेबद्दल सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले ,उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील ,सह फौजदार सुधाकर भोसले, चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार दीपक बर्गे ,पोलीस नाईक सुनील अब्दागिरी, अंमलदार शंकर सुतार, अविनाश घाडग, पोपट बिचुकले, अमोल जगदाळे व होमगार्ड पथक यांनी या कारवाईत सहभाग घेतला या यशस्वी कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके या अधिकाऱ्यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व पोलीस ,महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here