Home महाराष्ट्र चातारी येथे ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरात पाणी जाऊन लाखो रुपयाचे नुकसान

चातारी येथे ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरात पाणी जाऊन लाखो रुपयाचे नुकसान

110

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 21 जुलै):-तालुक्यातील चातारी,कोपरा, बोरी,निगडी उंचवडत, देवसरी येथे काल रात्री ढगफुटी होऊन गावातील लोकांच्या घरात पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन अचनक झालेल्या ढगफुटीच्या पावसाने रात्रीची वेळ असल्याने पावसाचे पाणी घरात शिरले त्या पाण्याने गवातील लोंकाच्या घरातील सोयबीन गहु ज्वारी सर्व प्रकारचे धान्य भिजुन अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

चातारी येथील देवसरी रस्त्या पासुन गावातुन झेंडा चौकातुन नदीकडे जाना र्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने गावकरी मात्र त्रस्त झाले आहेत त्यांचे झालेले नुकसान कोन भरून देणार असा प्रश्न नागरीक करत आहेत.

तसेच रात्री झालेलया ढगफुटीच्या पावसाने अतीवृष्टी होऊन लोकांच्या शेतातील खरीप हंगामाची सोयाबीन कापूस हळद ज्वारी केळी उस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणान नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी सकटात सापडलेला आहे.

त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई त्वरीत मिळवुन घ्यावी.. असी मागणी चातारी येथील नागरीकांनी उमरखेड तालुक्याचे तहसिलदार डॉ.देउळगावकर साहेब व भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वय समितीचे नितीनभाऊ भुतडा व कृषी अधिकारी साहेब यांनी चातारी गावातील नुकसानीची पाहणी केली.

या वेळी त्यांचे सोबत यवतमाळ जिल्हयाचे उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, ॲड.अनिलराव माने, शक्तीप्रमुख माधव माने, बुथ प्रमुख बालाजी माने, बुथ प्रमुख केशव धात्रक, बुथ प्रमुख राजेश कदम, चातारी गावचे सरपंच रंजनाताई माने यांचे पती संतोषराव माने सर तसेच गावतील बहुसंच्य जनसमुदम उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here