Home Breaking News पुसद शहरात पुन्हा नवयुवकाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या

पुसद शहरात पुन्हा नवयुवकाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या

114

🔺हत्याकांडाची मालिका सुरूच, पोलीस यंत्रने पुढे गुन्हेगारी जगताचे आवाहन?

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

पुसद(दि. 21जुलै):- शहरात खुनाचे सत्र सलग सुरू आहे. पुसद नागपूर रोडलगत असलेल्या विठाळा वार्ड येथे बुधवारी रात्री काका पुतण्याच्या हत्याकांडाने पुसद शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच आता पुन्हा एका 23 वर्षीय नवयुवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

सलग होत असलेल्या खूनांच्या या मालिकेमुळे संपूर्ण शहरासह जिल्हा ही हादरला आहे.संघदीप संजय भगत वय 23 वर्ष राहणार धम्म नगर पुसद असे मृतक नवयुवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार संघदीप हा मनोज सवंगडे हत्याकांडातील आरोपी असून त्या हत्याकांडाच्या कारणावरून संघदीपची हत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.

गुरुवारी सायंकाळी 9 वाजताच्या दरम्यान संघदीप आणि त्याचा मित्र हे गुणवंतराव शाळेजवळील ओम नगर येथील पाणीच्या टाकीमागे बर्थडेचा केप कापत असताना दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा जणांनी वाद घातला आणि नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर आरोपींनी संघदीपच्या डोक्यावर दगडाने वार करण्यात आले.

संघदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तर त्याचा मित्र जखमी झाला.खुनाच्या घटनेनंतर पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर हे घटनास्थळी दाखल झाले.तात्काळ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.सतत घडणाऱ्या खुण, हत्याकांड मालिकेमुळे पोलीस यंत्रने पुढे गुन्हेगारी जगताचे नवीन आव्हान निर्माण झाले आहे.यावर पोलीस यंत्रणा कसे अंकुश ठेवणार की घटनेमध्ये वाढ होणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here