Home महाराष्ट्र आठरी नाल्याच्या पुरामुळे वाहतूक झाली ठप्प

आठरी नाल्याच्या पुरामुळे वाहतूक झाली ठप्प

153

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466

ढाणकी(दि. 21 जुलै):-ढाणकी ते बिटरगाव रोडवर असलेल्या आठरी नाल्यावर होत असलेल्या संतत धार पावसामुळे नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे ढाणकी कडे जाणे बंद झाले असून वाहतूक ठप्प झाली, ढाणकी हे मोठे बाजारपेठ असून बिटरगाव परिसरातील जवळपास दहा ते पंधरा गावातील लोक दळणवळण करत असतात त्यामुळे ये जा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

2022 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार साहेबांनी पाहणी केली होती परंतु नवीन फुलाच्या बांधकामासाठी अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही हे पाहायला दिसून येत आहे व तसेच जनतेचे लोकप्रतिनिधी खासदार आमदार याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे जनतेचा नाराजीचा सूर दिसत आहे. शेतीच्या कामासाठी ढाणकी ते चिंचोली या रोडवर ढाणकी येथील शेतकऱ्यांची शेती असल्यामुळे शेतकरी पुराच्या पाण्या मुळे अडकून बसलेली आहेत.

आठरी या नालाचा पुराच्या पाण्याचा प्रश्न पुढचे वर्षी सुटेल का हा जनतेला प्रश्न पडलेला आहे कायमस्वरूपी नवीन पूल बनवावा अशी मागणी जनतेची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here