✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
ढाणकी (दि.21 जुलै):-ढाणकी शहरामध्ये चारित्र्याचा संशय मनात धरून पतीने केला पत्नीचा धारदार लोखंडी सुरी ने खून केल्याची घटना घडली आहे.
आज दिनांक 21 जुलै 2013 रोजी फिर्यादी नामे सौ.वनिता गजानन दुपलवाड वय 35 वर्ष व्यवसाय शेती/मजुरी रा. खरुस ता.उमरखेड जि. यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे जवानी रिपोर्ट दिला की, दिनांक 21 जुलै 2013 रोजी सकाळी 4 वा ते 4:30 वा च्या सुमारास आरोपी नामे शिवाजी दशरथ नारमवाड वय 30 वर्ष रा. चिंचाळा ता. भोकर जि. नांदेड याने चारित्र्याचा संशय मनात धरून पत्नीचा धारदार लोखंडी सुरीने मृतकाच्या मानेचे उजव्या बाजूला वार करून फिर्यादीचे वडिलांच्या राहत्या घरी वार्ड क्रमांक 2 ढाणकी येथे सौ. कविता शिवाजी नारमवाड हिचा खून केला आहे.
तरी आरोपी नामे शिवाजी दशरथ नाराम वाढ यांचे विरोधात अप क्र. 278/2023 कलम 302 भ.द.वी गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.सदरचा तपास मा. डॉ.पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियूष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.प्रदीप पाडवी उप. वि. पो. अ. यांच्या मार्गदर्शनात तपास ठाणेदार स.पो.नि सुजाता बन्सोड हे करीत आहेत.