Home महाराष्ट्र अखेर तिवरंग-तळणी पूल मंजूर-माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सर यांनी केला...

अखेर तिवरंग-तळणी पूल मंजूर-माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सर यांनी केला होता पाठपुरावा

97

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि.21 जुलै):-मराठवाड्याला जोडणारा बहुचर्चित तिवरंग तळणी मार्गावरील पैनगंगा नदीवरील पुलासाठी मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील नागरिकांच्या दृष्टीने पैनगंगा नदीवरील तिवरंग ते तळणी येथील नदीवरील पूल हा अंत्यत महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षा पासून लोकसहभागातून श्रमदान करून सिमेंट पाईप टाकून नदीवर तात्पुरता पूल तयार करण्यात येत होता.

पण पावसाळ्यात हा पूल पाण्यामुळे खरडून जात होता. पावसाळा निघून गेला की पुन्हा त्या पुलाची दुरुस्ती करण्यात येत होती.

आज पर्यंत नागरिकांच्या सहकार्याने दरवर्षीच पुलाची दुरुस्ती करण्यात येत होती. त्यामुळे हा पूल कायमस्वरूपी होणे अतिशय महत्त्वाचे होते.

हा पूल कायमस्वरूपी व्हावा यासाठी गावातील ग्रामस्थांनी थेट नदीपात्रात आमरण उपोषण सुद्धा केले होते.

तसेच मुळावा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सर यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड यांची अनेकदा भेट घेऊन या पुलाची मागणी केली होती.

तसेच एकनाथ शिंदे हे राज्याचे बांधकाम मंत्री असताना अविनाश कदम यांनी सुद्धा निवेदन देऊन या पुलाची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळाले असून या पुलासाठी महाराष्ट्र शासनाने 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here