✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 21 जुलै):-आदिवासी बांधवांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तथा संसदे मध्ये लागू करण्यात येत असलेल्या UCC कायद्या च्या विरोधात “राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदे” च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात तहसील स्तरीय धरणे प्रदर्शन करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सूरज मोरे यांच्या नेतृत्वामध्ये उमरखेड तहसील परिसरात धरणे प्रदर्शन करण्यात आले.आणि तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष पुजाराम हाटकरे, पवार सूर्यकांत वाढवे, सूरज मोरे, दिनकर वाठोरे इत्यादी उपस्थित होते