Home महाराष्ट्र अनेक जणांच्या मोबाईलवर एक सिक्युरिटी अलर्ट

अनेक जणांच्या मोबाईलवर एक सिक्युरिटी अलर्ट

115

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ (दि. 20जुलै) आज सकाळपासून अनेक जणांच्या मोबाईलवर एक सिक्युरिटी अलर्ट येत आहे.हा प्रकार नक्की काय? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सकाळी 10 ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला.

यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचे सांगण्यात आले. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला.

आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.

विशेष म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असला तरी अॕपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.

हा मॕसेज एकट्या तुम्हालाच आला नसुन देशातील अनेकांना आला असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याची कींवा Ok बटन दाबल्यामुळे काही अर्थीक लुबाडणुक झाली का ? अशी शंका बाळगण्याची गरज नाही.

सकाळपासून नागरिकांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज येत आहे. याची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांच्याशी संवाद साधला असता; “अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे.

सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही.”

असे स्पष्टीकरण दिले आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here