Home बीड कोमलवाडीसह परिसरात विजेचा लपंडाव‌; तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित‌ : ग्रामस्थ वैतागले

कोमलवाडीसह परिसरात विजेचा लपंडाव‌; तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित‌ : ग्रामस्थ वैतागले

182

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.20जुलै):-तालुक्यातील भाट अंतरवाली सबस्टेशन अंतर्गातील देवपिंपरी, कोमलवाडीसह परिसरातील अनेक गावांची विद्युत पुरवठा हा मागील‌‌ तीन दिवसांपासून मिनिटाला बंद‎ होत असून सतत लाईन बंद राहते‎. हवा पाणी आले तर रात्रभर लाईन‎ बंद राहते. गेल्या तीन दिवसांपासून वीज सतत खंडीत असल्याने गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे अंधार आहे. पावसाळ्याचे दिवस असुन‎ नागरिकांना अंधारात फिरावे लागत‎ आहे. यामुळे जीविताला धोका‎ निर्माण झाला आहे.

परिसरातील सर्व‎ पीठ गिरण्या बंद असल्याने‎ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच लाईन पूर्णतः बंद‎ असल्याने सार्वजनिक पाणी पुरवठा‎ पूर्णतः बंद झाला आहे. यामुळे‎ नागरीक पिण्याचे पाण्यापासून‎ देखिल वंचित झाले आहे. तसेच गावातील लहान मुले व‎ आजारी व्यक्तींना जीवन जगणे‎ कठीण होऊन बसले आहे. याबाबत सबस्टेशनला व संबंधित लाईनमन यांना संपर्क साधून लाईन बंद असल्याचे सांगितले असता लाईन वरून गेली आहे. गेवराईला फाॅल्ट आहे. असे सांगितले जात आहे. विजेच्या‎ लंपडावामुळे जीवनावश्यक पाणी व‎ दळण मिळणे कठीण झाले‎ असल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले आहे.

लाईन‎ आली तर किती वेळ टिकेल याचे‎ काही सांगता येत नाही. लाईन आली‎ तर केवळ ५ मिनीट चालते व लगेच‎ लाईन बंद पडते, असे सतत लाईनचे‎ जाणे येणे सुरु आहे.लाईन गेल्या पेक्षा लाइन आल्यास‎ दुःख होते. कारण आलेली लाईन‎ अजून कधी बंद होईल हे सांगता येत‎ नाही.त्यामुळे सर्व‎ वेळ लाईन राहील याकरिता महावितरण विभागाने योग्य ती‎ तातडीची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here