Home महाराष्ट्र किरीट सोमय्यांच्या निमित्ताने राजकारणाची पातळी घसरली-हेमंत पाटील

किरीट सोमय्यांच्या निमित्ताने राजकारणाची पातळी घसरली-हेमंत पाटील

74

🔸चौकशी पुर्ण होईस्तव नाहक बदनामी थांबवण्याचे आवाहन

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.१९ जुलै):-राज्यातील राजकारण सध्या एका चित्रफितीमुळे चांगलेच तापले आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या या चित्रफितीचा मुद्दा थेट विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे.ठिकठिकाणी सोमय्यांविरोधात आंदोलन केले जात आहे.सोमय्यांच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही.परंतु, ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे.यासंपूर्ण प्रकरणाची योग्य तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी पुर्ण होईस्तव सोमय्यांची नाहक बदनामी करू नये,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी केले.

सोमय्यांच्या चित्रफितीमुळे राज्यातील राजकारणाचा दर्जा खालावल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.अनेकांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांचे पितळ उघडे पाडणाऱ्या सोमय्यांना विरोध करायचा असेल तर त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे बाहेर काढून करावा, असे आवाहन देखील हेमंत पाटील यांनी त्यांच्या विरोधकांना केले आहे.एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोक्यावून त्यांला उद्वस्त करण्याचे राजकारण थांबवले पाहिजे, असे देखील पाटील म्हणाले.सोमय्यांनी कुणा महिलेवर दबाब टाकून तिच्यावर अत्याचार केला असेल, तर या बाबीची देखील सखोल चौकशी करावी. पंरतु, चौकशी होईस्तव एखाद्याचे वैयक्तिक आयुष्यातील चित्रफिती प्रसारित करणे चुकीचे आहे,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

चौकशी पुर्ण होईपर्यंत एखाद्याला दोषीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही.किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती नाही.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल,असे विधिमंडळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल.योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्यच पंरतु, हे ठरवत असतांना कुणाचीही नाहक बदनामी करणे संयुक्तित ठरणार नाही,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
…………………………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here