🔹विविध विषयांवर होणार चर्चा आणि सभासद नोंदणी
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.21जुलै):-सैनिक समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने हर जन सैनिक, घर..सैनिक तयार करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष बलविर सिंह परमार, किसान मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्रीधर दरेकर,महाराष्ट्राचे प्रभारी कमांडो ईश्वर मोरे, प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे , युध्दविर कॅप्टन अरुण कदम, राष्ट्रीय फिल्म इंडस्ट्री प्रमुख जिवन कोल्हे, प्रदेश सचिव अरुण खिची , कार्याध्यक्ष तुकाराम डफळ,विदर्भ प्रमुख संतोष चर्हाटे, सुचिता भोयर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात सभासद संख्या वाढवून , सैनिक समाज पार्टी मजबूत करण्यासाठी तसेच गडचिरोली , अहेरी आणि आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात विविध प्रकारच्या महत्त्वाच्या पदांची निवड करण्यात येणार आहे.
त्याबरोबरच सर्व विधानसभा क्षेत्रातील जन प्रतिनिधी, जनतेच्या कृषी , पोषण आहार ,बॅकिंग , ग्रामीण व शहरी आवास – निवास योजना , परिवहन , विधुत, आरोग्य सेवा , पर्यावरण , पेंशन, शिक्षण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या, राष्ट्रीय सुरक्षा, लघु उद्योग, कंत्राटी धोरण,पाटबंधारे ,वनहक्क जमीनीचे पट्टे , नोकरी, जनजातीचे प्रमाणपत्र , वृद्ध नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या, शहीद कुटुंबाच्या समस्या , अनुकंपा विषयक, सफाई कामगारांच्या समस्या यासारख्या अनेकविध विषयांवरील समस्या सोडविण्यासाठी दिनांक २२ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजेपासून २३ जुलै दुपारी ४ वाजेपर्यंत रेस्ट हाऊस इंदिरा गांधीं चौक गडचिरोली येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या समजून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात सादर करण्यासाठी स्वत: प्रत्यक्ष उपस्थित राहावे. असे आवाहन सैनिक समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी जिल्हा महासचिव प्रकाशसिंग बंडवाल, जिल्हाध्यक्ष सी. पी. मेश्राम, गडचिरोली तालुका कृषी मोर्चाचे अध्यक्ष अश्विन रोहनकर, आरोग्य शिक्षण पेंशन विभागाचे गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रमोद सोमनकर, गडचिरोली विधानसभा जनसंपर्क प्रमुख हंसराज उराडे यांनी केले आहे.