अण्णाभाऊ ,
तुम्ही जागतिक कीर्तीचे
समतेचा विचार
लेखणीतून पेरणारे
थोर साहित्य सम्राट
थोर साहित्यिक
अण्णाभाऊ ,
धगधगणाऱ्या तुमच्या शब्दातून
तुम्ही मानवतावाद
शेवटपर्यंत जोपासला
तुमच्या प्रत्येक साहित्यिक
कलाकृतीतून
अण्णाभाऊ ,
लावणीला पूर्ण बदलवून
तुम्ही कामगारांच जीवनच
लावणीत रेखारलं
आणि एक नवा दृष्टिकोनच
लावणीला देऊन
जगप्रसिद्ध केलं
अण्णाभाऊ ,
तुमच्या लेखणीचे प्रेरणास्थान
वंचित कष्ठकरी आणि
शोषित कामगार
तयांचे जीवन कथा-कादंबरीतून
तुम्ही केले साकार
अण्णाभाऊ ,
तुम्ही साहित्यसम्राट
लेखणीला होती तुमच्या
वास्तवाची धार
दंभावर केले तुम्ही
शब्द निखाऱ्यांनी वार
अण्णाभाऊ ,
तुम्ही साहित्यातून
वंचितांना-उपेक्षितांना न्याय दिला
शोषितांचे वर्णित जीवन वाचून
वाचकही करुण रसात
ओलाचिंब झाला
अण्णाभाऊ ,
वाटेगावातून पायी केलेला
प्रवास थेट विमानापर्यंत पोहचून
रशियापर्यंत पोहोचला
पण तुमचे पाय मात्र
जमिनीवरच राहिले.
अण्णाभाऊ ,
तुम्ही कथा-कादंबऱ्यातून
रेखाटलेल्या प्रत्येक पात्रात
ओतला प्राण
कारण तुमच्या लेखणीला
कल्पितांचे पाख नसून
वास्तवाचे होते भान
संत कबीर कविराज
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
✒️कवी:-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती.भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९