▪️एक महावितरण मध्ये काम करणारा अधिकारी दाढी करण्यासाठी सलूनमध्ये गेला व दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचला…!!
दाढी ———- ₹.10/-
ब्लेड अधिभार- ₹. 2/-
वस्तरा भाडे — ₹. 3/-
क्रीम ———— ₹. 5/-
कात्री भाडे —– ₹. 3/-
खुर्ची भाडे —— ₹.10/-
लोशन ———– ₹. 7/-
पावडर ———- ₹. 5/-
नॅपकिन भाडे — ₹. 5/-
——————————-
*एकूण – ₹. 50/-*
🤔 *बोर्ड* वाचून *अधिकाऱ्याने* विचारले :- तुम्ही तर कमालच केलीत. *दाढी फक्त १० रु.* लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची *लूट* करताय.!!!
*दुकानदार : –“हा बोर्ड मोठ्या अक्षरात* आणि *शुद्ध मराठीत* असल्याने तुम्हाला वाचता तरी येतो साहेब.
तरीही, तुम्ही मला *जाब विचारताय?*
*”तुमच्या महावितरणकडून अनेक वर्षांपासून आमची महा-फसवणूक सुरू आहे त्याचं काय?*
स्थिर आकार,
वीज आकार,
वीज वहन आकार,
इंधन समायोजन आकार,
वीज शुल्क
वीज विक्री कर,
व्याज,
इतर आकार,
चालू वीज देयक,
थकबाकी,
समायोजित रक्कम,
व्याजाची थकबाकी,
एकूण थकबाकी,
देयकाची निव्वळ रक्कम,
…. पूर्णांक देयक…
*”हे विज बिल आजपर्यंत किती जणांना कळले ते सांगाल का?”*
महावितरण अधिकारी *दाढी* न करताच पळुन गेला…।😊😂
(जनतेचे *डोळे उघडे* होई पर्यंत शेअर करत रहा, जो पर्यंत जनता *लुटवायला तयार* आहे, तो पर्यंत *महावितरण तर लुटायलाच* बसलेलं आहे…)
🙏 जागो ग्राहक जागो 🙏🏻