Home महाराष्ट्र *डाॅ.मासाळ यांना परमपुज्य यशवंतराव माने युवाविद्यार्थी पुरस्काराने सन्मानित

*डाॅ.मासाळ यांना परमपुज्य यशवंतराव माने युवाविद्यार्थी पुरस्काराने सन्मानित

116

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो’-9075686100

म्हसवड(दि.17जुलै) : म्हसवड, ता. माण, जि. सातारा येथील नगरसेवक डॉ.वसंत सावळा मासाळ यांना यशवंतराव माने युवाविद्यार्थी पुरस्कार-२०२३ ने सपत्निक सन्मानित करण्यात आले
म्हसवडसारख्या नावाजलेल्या नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक म्हणून ते कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी माणगंगा शैक्षणिक संकुलाची स्थापना केली आहे.

यामाध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.माणगंगा क्लिनीकबरोबरच अॅम्बुलन्सची सेवा ते अत्यल्प दरात करतात.कोरोनाच्या महामारीत त्यांनी शेकडो रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले आहे.यावेळी डॅा.मासाळ म्हणाले,माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना श्री.संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी दिल्यानेच मेंढपाळाचा मुलगा डॅाक्टर होऊ शकला.मला आश्रमशाळेतून शिक्षणासंदर्भात प्रेरणा मिळत गेली.मी या आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे आवर्जून सांगितले.म्हसवड सारख्या खेडेगावात माझा जन्म झाला.घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती.आई,वडील मोलमजूरी करून आम्हा चार भावंडांना सांभाळत होते.माझे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा मासाळवाडीत झाले.

माध्यमिक शिक्षणासाठी श्री.गाडगे महाराज आश्रमशाळेत प्रवेश घेऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.ज्युनिअर कॅालेजसाठी कर्मवीर भाऊराव पाटील देवापुर तर BHMS वैद्यकीय शिक्षण संगमनेर येथून पुर्ण केले.पुण्यात पुढील शिक्षण व सराव करून २००९ साली म्हसवड येथे माणगंगा क्लिनीक नावाने वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

गाडगे बाबा,माने बाबांनी जी शिकवण दिली त्यांच्या प्रेरणेतूनच मी समाजसेवा,गावातील अंधश्रद्धा कमी झाली पाहिजे,मुलांना शिक्षण दिले पाहिजे या विचाराने मी हैराण झालो होतो.स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत ग्रामीण भागातील मुलामुलींना पॅरामेडीकलचे शिक्षण,डीएमएलटी,रेडीओलाॅजी,स्किल इंडीया नर्सिंग कोर्स सुरु केले आहेत.पहिली ते दहावीपर्यंत संपुर्ण इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू असून समाजकारण व राजकारण करत असताना जनतेचा विश्वास संपादन केला.कोवीडकाळात आ.जयकुमार गोरेंच्या सहकार्याने मोफत आरोग्य सेवा दिल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब माने,क्षीरसागर सर,दिलीप तुपे,हिरालाल काटकर,कृष्णा मदने,सौ.सविता मासाळ यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.या सन्मानाबद्दल माढ्याचे खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर,माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह विवीध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here