Home Breaking News यवतमाळ येथे युवकाचा खून

यवतमाळ येथे युवकाचा खून

87

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ (दि. 17 जुलै) शहरात खुनाचे सत्र सुरूच असून काल ऐक युवकाच्या स्टेट बँक चौकात रहदारीच्या रस्त्यावरती खून करण्यात आला.

आज परत दि. 17 जुलै सायकाळी 8:30 च्या सुमारास विश्वकर्मा नगर पिंपळगाव परिसरात पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना यवतमाळात घडली आहे. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव परिसरातील रहिवासी नितीन कवडू देसाई (वय 47) रा. तिरुपती सोसायटी दोणाडकर लेआऊट याची पिंपळगाव रोडवरील विश्वकर्मा नगर मध्ये काही मित्रां सोबत दारू पित असताना अज्ञात व्यक्तींनी सायंकाळी 8:30 वाजता भर रस्त्यात धारधार शस्त्राने चार ते पाच युवकांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

नितीनला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या हल्लेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी टीम गेली असून आरोपी लवकरात लवकर तब्येत घेतली जाईल अशी ग्वाही देण्यात आली. यावेळी ॲडिशनल एस.पी.सोहब, एसडीपीओ सोहळा, सतीश चवरे, देविदास पाटील, शंशी नवकार, आत्राम,महेश मांगुळकर,अंकुश फेडर तपास कामात असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम रात्री सुरू आहे.

यावेळी नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची चिंता लागली असून अजून किती हत्या होणार त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here