✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 16 जुलै):- ग्राम विकास शिक्षण संस्था पारडगांव द्रारा संचालित ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा येथे सहविचार सभा , गुणवंत विद्यार्थी तसेच पालक विशेष म्हणजे ब्रम्हपुरी येथील पत्रकार गोवर्धनजी दोनाकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा व हळदा येथील विद्यार्थी वर्ग10वि मध्ये प्रथम क्रमांक कु. सुप्रिया देविदास राऊत बेटाळा व प्रवृत्ती मोरेश्वर धानोरकर हळदा , द्वितीय क्रमांक कु.खुशी संजय दर्वे सोनेगाव व जानकी तुकाराम कोरडे हळदा तृतीय क्रमांक प्रणय विलास राऊत बेटाळा, कु. प्राची शंकर आष्टेकर हळदा याउत्तीर्ण झालेल्या विद्यालयाच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा शाल, श्रीफळ भेटवस्तू व रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी शाळा / संस्था व गुरुजप्रती कृतज्ञता प्रगट केली. तसेच पालकानीही आपल्या मनोगतान शाळा व संस्थेप्रती समाधान व्यक्त केले. म्हणजे ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा शाळेतून शालांत परीक्षा होवून बाहेर पडणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी 2023 या सत्रात उज्वल यश संपादन केले.
त्यामध्ये प्रफुल पांडुरंग पिलारे पारडगाव,श्यामसुंदर चिंतामण मंडपे पाडगांव ,सतिश वामन अवसरे बेटाळा, सुरज सदाशिव शेंडे बेटाळा, कु. ऐश्वर्या शशिकांत दर्वे सोनेगाव यांची प्रशासकीय सेवेमध्ये चांगल्या पदावर नियुक्ती झाली आहे. संस्थेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सभेच्या दुसऱ्या सत्रात वर्षभरातील नियोजनव उपक्रम तसेच स्पर्धा परीक्षेचे सराव याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी तोंडरे ,सचिव आर.बी विधाते , कोषाध्यक्ष रमेश ठाकरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष डी .आर .रेहपाडे, संस्थेचे सदस्य निशांत पत्रे,प्रमिला ताई पत्रे, तसेच व्ही. एस. तोंडरे मुख्यध्यापक बेटाळा, जे. के. ठाकरे मुख्यध्यापक हळदा, व दोन्ही शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आर. आर.तुपटे व आभार विष्णूजी तोंडरे मुख्यध्यापक यानी केले.