🔹संतश्रेष्ठ सावता माळी महाराज यांचे जीवनकार्य प्रेरणादायी – जे.एस.पवार [ मुख्याध्यापक ]
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)
धरणगांव(दि.16जुलै):- सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून आपल्या कर्मात देव पाहणारे, वारकरी संप्रदायाचे दैवत, कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे, विज्ञाननिष्ठ संत, आपल्या कामावर नित्तांत निष्ठा असणारे, कर्मयोगी, समाज प्रबोधकार, पांडुरंगाचे परम भक्त,संतांचे संत, संतश्रेष्ठ शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू-भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले.
संत शिरोमणी सावता महाराज यांचे जीवन कार्य मानव जीवनासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी करून महाराजांच्या स्मृतींना उजाळा दिला व महाराजांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.