✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.16जुलै):-गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व लोकसंख्या मंडळाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कार्तिक पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात जागतिक लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य लेप्टनंट डॉ. प्रफुल्ल बन्सोड, प्रमुख वक्ते वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. हरेश गजभिये होते.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ रहांगडाले, सुत्रसंचालन प्रा. आशुतोष पोपटे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. राकेश कुमरे, यांनी मानले.या कार्यकमाला डॉ. कत्रोजवार, डॉ. कामडी, प्रा. रोशन कुमरे, प्रा. वाघमारे, प्रा. रिना भोयर , प्रा.अमर ठवरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अश्विन चंदेल यांचे मार्गदर्शन लाभले होते.