🔸वर्षभराच्या आतच केलेल्या ढिसाळ कामाचा दर्जा उघड- दिसताहेत भेगा
✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभाग प्रतिनिधी)मो:-8080942185
केज(दि.15जुलै):-केज तालुक्यातील कौडगाव येथे ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांपैकी दलितवस्ती सुधार योजनेच्या नावाखाली आलेल्या लाखो रूपयांच्या निधी तून केल्या गेलेल्या सिमेंट काॅंक्रेटीकरण रस्त्याचे व नालीबांधकामांचे काम ऑक्टोबर- नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आले होते सदरील कामाला आज मितीला सरासरी आठ महिने सुद्धा झाले नाही तोपर्यंत कौडगाव ता-केज येथील ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने केलेल्या कामाचा अत्यंत निकृष्ट व हीन दर्जा आज उघड झाला आहे.
सदरील रस्त्याला लांबलचक चिरा पडून रेती व माती स्वरूपाचा पांढरा फुफुटा दिसत असून यावरूनच कामचा दर्जा लक्षात येत आहे.त्यावेळेसच्या माजी सत्ताधार्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाच्या नावावर केंद्र सरकार व राज्यसरकार च्या विविध योजना राबवण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला त्यातील लाखो रूपयांचा निधी सदरील कामासाठी खर्च झालेला दाखवून सदरील कामे बोगस निकृष्ट दर्जाचे करून अतिरिक्त लाखो रूपयांचा निधी घशात घालून जनतेच्या टाळूवरंचं लोणी खाण्याचे काम केल्याचे उघड होत आहे.