Home Breaking News फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून...

फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

77

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

धुळे(दि.15जुलै):- आजच्या युगात जवळपास प्रत्येक माणूस कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कसे कमविता येईल याचाच विचार करीत असतो. लोकांच्या नेमका याच प्रवृत्तीचा फायदा गुन्हेगार घेत असतात त्यात सायबर गुन्हेगार हे आघाडीवर आहेत. यात ते नागरीकांना विविध प्रकारची आमीषे / प्रलोभने दाखवतात. आता त्यांनी नागरीकांना लुबाडण्याचा एक नविन फंडा शोधून काढला आहे तो म्हणजे “फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा अशी स्कीम’. यात सायबर गुन्हेगार हे आपल्या इन्स्टाग्राम / टेलिग्राम अकौउंटवर एक मॅसेज / लिंक पाठवितात की, तुम्ही घर बसल्या “फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि दिवसाकाठी २०,०००/- रुपये सहज कमवा आपण तेथेच फसतो.

या फसव्या जॉब स्कीममध्ये सायबर गुन्हेगार हे आपल्याला सुरुवातीला मेंबर होण्यासाठी त्यांच्या बँक अकौंटवर २ ते ५ हजार रुपये भरायला लावतात नंतर हळूहळू वीस हजार रुपयांपर्यत भरायला लावून त्यातून आपल्याला आपलेच पैसे परत करतात जेणेकरुन लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो आणि नंतर याच पध्दतीने मोठी रक्कम जसे की, एक ते पाच लाख रुपयांपर्यंत भरायला लावतात आणि हे आपले भरलेले पैसे आपल्याला परत पाहिजे असतील तर पुन्हा काही रक्कम भरायला लावतात आणि येथेच आपली फसवणूक होते अशा पध्दतीने हे सायबर गुन्हेगार आपली आर्थिक फसवणूक करतात.

या पध्दतीची कुठल्याही प्रकारची स्कीम अस्तित्वात नाही, म्हणून सर्व इस्टाग्राम व टेलिग्राम धारकांनी अशा फसव्या जॉब संदर्भात आलेल्या मॅसेजला उत्तर देवू नये व अज्ञात लोकांनी पाठवलेल्या मॅसेजला बळी पडू नये व आपल्या मित्रांच्या नावाने देखील मॅसेज आले असेल तर त्याला विचारुन त्याबाबतची खात्री करा व आपले इन्स्टाग्राम / टेलिग्राम प्रोफाईल प्रायव्हेट ठेवा व इन्स्टाग्राम वर जॉब संदर्भात आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करु नये तसेच आपली बँकेसंदर्भातची सर्व माहिती गोपनीय ठेवावी असे आवाहन सायबर ॲवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे व नागरीकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या सोबत अशी फसवणूक झाली असेल तर त्वरीत www.cybercrime.gov.in. या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा १९३० या टोलफ्री नंबरवर तक्रार करावी अशी माहिती अॅड. चैतन्य भंडारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here