✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
ढाणकी (दि. 14 जुलै) बिटरगाव पोलीस स्टेशन येथे नुकत्याच रुजू झालेल्या प्रथम महिला ठाणेदार सुजाता बनसोड यांनी बिटरगाव परिसरातील अवैध धंद्यांवर एकापाठोपाठ एक धाडसत्र सुरूच ठेवले.
त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून आता मात्र खऱ्या अर्थाने बिटरगाव आणि ढाणकी परिसराला कर्तव्यदक्ष ठाणेदार भेटल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.दिनांक 14 जुलै रोजी गोपनीय माहितीवरून आरोपी स्वप्निल रमेश पराते वय 25 राहणार ढाणकी हा अवैध देशी दारू वाहतूक करताना मिळाला.
व त्याच्या जवळ 192 देशी दारूचे बॉटल, 4 पेटी अंदाजे किंमत 13440 रुपये व मोटरसायकल क्रमांक एम एच 29 डि के 1638 ही 50 हजाराचे मोटरसायकल असा एकूण 63 हजार 440 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे.कलम 65 ई मुंबई दारूबंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या मार्गदर्शक पीएसआय शिवाजी टिपूर्णे कॉन्स्टेबल निलेश भालेराव, प्रवीण जाधव यांनी केले.पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करीत आहे.