नप मुख्याधिकारी यांना निवेदन
सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.14जुलै):-उमरखेड शहरातील भारतरत्न, कायदे पंडित, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर जाहिरात बॅनरे, वैयक्तिक बॅनरे, वाढदिवसाचे बॅनरे, अभिनंदन बॅनरे इत्यादी असे प्रकारचे कोणतेही बॅनर महापुरुषांच्या पुतळ्यासमोर लागू नये. कारण लावलेल्या बॅनर मुळे महापुरुषाची प्रतिमा झाकल्या जात आहे.
तसेच उमरखेड शहरातील ग्राफिक डिझाईन दुकानदारांना महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अशी बॅनर लावू नये अशी नोटीस देण्यात यावी.या प्रकारची मागणी भीम टायगर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने उमरखेड नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश जामनेर यांना निवेदन देऊन केली आहे.
चौकट:- मी स्वतः व संबंधित कर्मचाऱ्याला सांगून बॅनर काढण्याची मोहीम तसेच यासंदर्भात काही दिवसांमध्ये मीटिंग चे आयोजन करण्यात येणार आहे.यापुढे शहरांमध्ये नप च्या परवानगी शिवाय बॅनर लागणार नाही – महेश जामनेर (नप मुख्याधिकारी उमरखेड) अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी यांनी दिली आहे.
यावेळी सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना उमरखेड), शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ), कैलास कदम (तालुका अध्यक्ष उमरखेड), संदीप विनकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.