✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.14जुलै):-साहित्यसम्राट ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या येणाऱ्या १०३व्या जयंतीचे औचित्य साधून पुसद तालुक्यातील मांडवा येथील साहित्यसम्राट ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे सुशोभीकरण व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आज दि.१४ जुलै २०२३ रोजी करण्यात आले.
यावेळी मांडवा गावाचे प्रतिष्ठित नागरिक अनिल पुलाते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सरपंच अल्का ढोले,उपसरपंच विजय राठोड,ग्रामविकास अधिकारी एस.टी.तडसे,पोलीस पाटील दत्तराव पुलाते,तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटी अध्यक्ष वसंता आडे,कारभारी तुकाराम चव्हाण, गोधाजी सुपले,पांडुरंग रणखांब, मारोती गजभार,प्रकाश ढोले, शिवाजी आबाळे,विश्वबंर दाढे,रमेश ढोले,दिलीप आडे,संजय लांडगे,शक्ती आडे,ग्राम परिवर्तन समितीचे अध्यक्ष बजरंग पुलाते, उपाध्यक्ष समाधान आबाळे,राजु दाढे,दत्ता जोगदंडे, देविदास गजभार,प्रभाकर लांडगे,अनिल जोगदंडे,विनोद आडे, गजानन आबाळे,संदिप आबाळे,बजरंग राठोड,समाधान लांडगे,रोहन गजभार, अर्जुन आडे, शैलेश जाधव ,सर्व ग्रा.पं.सदस्य,सर्व ग्रा.पं.कर्मचारी, सर्व प्रतिष्ठीत नागरिक, सर्व तरुण मंडळी, तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.