अंधार तुडवीत
गेलो होतो
कशास आम्ही ?
सुरतला
चिंताग्रस्त आम्ही
कोणती लावू ?
क्रीम आमच्या
सुरत ला
लक्झरी बस मध्ये
बसून आम्ही
पुढे पोहोचलो
गुवाहाटी
चमकीले हाती
ताट ठेविले
अजून न काही
पडले ताटी !
आता मिसळला
येऊन दादा
तो तर आहे म्हणे
लय भारी
ताटी पडण्या
आधीच पळवितो
सांगा आम्हाला
कोण तारी ?
शेतकरी ही
ओळख त्याची
म्हणतो जल
त्याची संपदा
आमच्या जीवनी
अर्थ कोणता ?
धाकधूक नी
बस चिंता
तोच घालतो
बांध सारे
काम ही करतो
एकटाच
कशाचे आले ?
खोके ओके
प्रवास आमचा
फुकटाच
जणू शेळीचे
शेपूट झाले
कशा हकलाव्या ?
माशा रे
कसे झाकू ?
इभ्रतीस आम्ही
नको सांगू देवा
उद्धवा रे…
✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)मो:-8625856081