✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 12 जुलै):-चंद्रपूर जिल्हा सहकार भारती ची कार्यकारणी सभा ब्रम्हपुरी येथील ब्रम्हपुरी अर्बन बँकेच्या सभागृहात संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाअध्यक्ष विजयजी गोटे उपस्थित होते.
या सभेमधे सहकार संदर्भातील येणाऱ्या विविध अडचणी वर विषयांनुसार चर्चा करण्यात आली. तसेच सहकार भारती संस्थागत सभासद नोंदणी व निधी संकलन आढावा घेण्यात आला.तसेच तालुका कार्यकारणी पूर्णगठीत करणे याबाबत चर्चा करण्यात आली.येत्या सत्रात नागरी व कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या संचालक व कर्मचारी यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले व कोल्हापूर येथील प्रदेश बैठकीची माहीती यावेळी देण्यात आली.
या बैठकीला ब्रम्हपुरी अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,माजी अध्यक्ष दत्ताजी कात्यायन,जिल्हा उपाध्यक्ष किशोरजी बुरांडे,जिल्हा महामंत्री जयंतजी श्रीवास्तव, संघटन प्रमुख प्रभाकरजी पाकमोडे,सह संघटक सतीशजी वासमवार,कोषाध्यक्ष महेशजी मासुरकर,कार्यकारणी सदस्य राजेशजी कावलकर, सूरजजी बोम्मावार, संजयजी मेश्राम,भैय्याजी जिभकाटे,विलासजी उरकुडे आदी जण उपस्थित होते. बैठकीचे संचालन सतीशजी वासमवार यांनी केले तर प्रभाकरजी पाकमोडे यांनी आभार मानले.