Home Breaking News सोईट गावाजवळ सापळा रचून पाच लाखाच्या गुटखा जप्त

सोईट गावाजवळ सापळा रचून पाच लाखाच्या गुटखा जप्त

92

(ठाणेदार सुजाता बनसोड यांनी अवैध वाहतूकीवर लगाम कसली)

✒️बिटरगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बिटरगाव(दि.11जुलै):- उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनाच्या ठाणेदार सुजाता बनसोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 5,99,600 रुपयाचा गुटखा विक्रीचा मुद्देमाल जप्त केला आहे.हिमायत नगर येथून ब्राह्मणगाव सोईट मार्गे ढाणकी गावामध्ये येत होता. पॉजो ॲपे मालवाहू मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा येत होता.

ब्राह्मणगाव ते सोईट गावाजवळ हिंदू स्मशान भूमी डांबरी रोड लगत सापळा रचून थांबून असतांना आरोपी नामे अब्दुल वाजिद अब्दुल करीम वय 50 वर्ष रा. हिमायत नगर जिल्हा नांदेड व मालक नामे सयद अमीर सयद खमर वय 40 वर्ष रा. हिमायतनगर जिल्हा नांदेड यांनी विक्री करण्यासाठी राज्य शासनाने अधीसुचने मध्ये नमूद राज्यात निर्बंध घातलेल्या अन्नपदार्थाचा नमूद तपशील चा मानवी सेवनास व्यापक जनहितार्थ असुरक्षित असलेला साठा विक्रीकरिता जाणीवपूर्वक साठवून व वाहतूक विक्री करून व तशी कबुली देऊन त्यांनी अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमाने 2011चे कलम 26 (2), कलम 27, कलम 30(2) अ चे उल्लंघन केले आहे.

त्याने लोक सेवकांच्या आदेशांचे उल्लंघन करून भारतीय दंड विधाने कलम 188 उपरोक्त आदेशा अन्वये विषारी अन्नपदार्थाचा विक्रीचा विक्रीकरिता साठा व वाहतूक करून भादवी ने कलम 272, 273, 328 चे देखील उल्लंघन केले असल्याने अब्दुल वाशिम अब्दुल करीम आणि मालक सयद अमीर सयद खमर यांच्या विरोधात कलमान्वे कायदेशीर फिर्याद आहे.

अशा लेखी रिपोर्टावरून आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 270/2023 कलम 188, 272, 273, 328 भा.दं.वी कलमांसह 59 प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतले आहे.

सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ मा. पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ मा. प्रदीप पाडवी उप.वि.पो.अ. उमरखेड यांच्या मार्गदर्शनात से.पो. नि सुजाता बनसोड यांच्या आदेशावरून पो.उप. नि शिवाजी टिपूर्णे, कर्मचारी मोहन चाते, निलेश भालेराव,प्रविण जाधव यांनी केली. पुढील तपास शिवाजी टिपूर्णे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here