🔺आपल्या पतीला सोडविण्याच्या प्रयत्नात पत्नीने गमविला जीव !
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिध,यवतमाळ)मो:-9823995466
पुसद(दि.10जुलै):- तालुक्यातील खंडाळा येथे उस तोडीचे पैसे देवाण-घेवाणीच्या कारणावरून महिलेच्या पतीला मारहाण करीत चार चाकी वाहनांमध्ये किडनॅप करून नेत असताना.अशावेळी पत्नीने अडविण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने वार करून महिलेच्या पतीला घेऊन पसार प्रसार झाले.याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता निरंजन राठोड वय 37 वर्षे रा.वसंतवाडी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.खंडाळा पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निरंजन हा मुकादम असून तो ऊसतोड मजुरांना पुरविण्याचे काम करत होता.अशातच मराठवाड्यातील एका कारखानदाराने ऊस तोडीसाठी मजुर पुरविण्याकरीता सुमारे दोन वर्षापुर्वी 5 ते 6 लाख रुपये मुकादम निरंजनला दिल्याची माहिती मिळाली आहे.परंतु काही कारणास्तव मजूरांना पाठवू शकला नाही.
मुकादम निरंजन ने घेतलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम परत देखील केली होती.उर्वरित रक्कम देण्यासाठी निरंजनकडून टाळाटाळ होत असल्याची माहिती खंडाळा पोलीस स्टेशनचे सूत्रांकडून मिळाली आहे.त्यामुळेच चार ते पाच जणांनी संगणमत करून दि.10 जूलै 2023 रोजीच्या रात्री स्कार्पिओ गाडीने वसंतवाडी गाठले.चार ते पाच जणांनी रात्री बारा वाजताच्या दरम्यान निरंजनला मारहाण करून घेऊन स्कार्पिओ गाडीमध्ये प्रसार होत असतांनाच निरंजनची पत्नी वाहनाच्या समोर उभी झाली.
वाहन आडविल्याचे पाहून वाहनाने धडक देऊन चार ते पाच जण वाहनातून उतरून धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या अनिताचा काही क्षणातच मृत्यू झाला.चार ते पाच जणांनी ताब्यात घेतलेल्या निरंजनला अपहरण करून वाशिम मार्गे मेहकरकडे पसार झाले.
स्कार्पिओ वाहनांमध्ये पसार झालेल्या चार ते पाच जणांना पकडण्यासाठी खंडाळा पोलिसांची एक टीम रवाना करण्यात आली असून हल्ला करणारे चार ते पाच जण पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गोपाल चावडीकर यांनी दिली आहे.