Home महाराष्ट्र वंदना बरडे अधीसेविका यांचा आरोग्यविषयक उपाययोजनेवर मोलाचे मार्गदर्शन

वंदना बरडे अधीसेविका यांचा आरोग्यविषयक उपाययोजनेवर मोलाचे मार्गदर्शन

94

🔸बचतगट सावित्रीबाई फुले लोकसाधन संचालित साधन केंद्र वरोरा सर्वसाधारण सभा उपक्रम

✒️वरोरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि. 9 जुलै):- आशीर्वाद मंगल कार्यालय वरोरा येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.सर्व बचतगट पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते यांनी पाहुण्यांचे टाळ्यांच्या गजराने स्वागत केले.मंचावर उपस्थित मा.श्री इंगळे सर विभगिय अधिकारी म.वि.स. ,मा.रुपेश शेंडे सर,मा.आतेश अलि अहमद सर माजी नगराध्यक्ष साहेब,मा.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका मॅडम उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर, सौ.अनिताताई पाटील सी. एम.आर .सी.अध्यक्ष,सौ सोनल दांडगे अधिपरिचारीका, श्री अमित मानकर विस्तार अधिकारी.मा श्री भोयर नगरपरिषद वरोरा ईत्यादी उपस्थित होते.

सावीत्रिबाई फूले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून दिपप्रज्वलन मान्यवरांनी केले.आणी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणाची सुरुवात गणेश वंदनानाने केली. बचतीविषयी मार्गदर्शन केले.जशी आपण पैश्याची बचत करतो.तसेच आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे.आरोग्याची काळजी घेतली तर आपला बराच पैसा वाचतो आणि आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही.आणी पैश्याची बचत होते.तर आरोग्य चांगले राहण्यासाठी कायकाय करायला पाहिजे त्यांची उपाययोजना सांगितले.काही गोष्टी लहान लहान जरी असल्या तरी त्या पुढे जाऊन मोठें रूप धारण करू शकते येथे काॅन्सर विषयी सांगितले काॅन्सर किती भयानक असतो पण आपण वेळीच काळजी घेतली तर आपण आपलं जीवन वाचवू शकतो.म्हणून आरोग्याची काळजी घेणे खूप जरुरी आहे.वरोर्यामध्ये खुप जमिन पडीत पडुन आहे तेथें किंवा मक्तेदारीने शेती करावी आणि तेही शेंद्रीय शेती करावी असे आवाहन केले आहे.

आपले चांगलें खानपान, चांगलें आचारविचार,रहनसहन ,समज गैरसमज जिवनात खूपच बदल घडून आणतात.आपण आपलीं संस्कृती नुसार न राहता पाश्चात्यांच्या पावलांवर पाऊल टाकत आहोत.जे आपल्या आरोग्यालाही हानीकारक आहे.म्हणून आपलं भारतीय खानपान आचारविचार रहनसहन ही चांगली असायला पाहिजे.काही खाद्य पदार्था विषयी गैरसमज असतात ते दुर केलेत . सामाजिक जाणीव ठेवून आपले व्यवहार असायला पाहिजे., स्पर्धा मध्यें भाग घ्यायला पाहिजे.त्याने आपलीं उन्नती साधता येते.प्रगतीच्या मार्गावर कशे पदक्रमन करायचे याविषयी मार्गदर्शन केले, कूठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, अश्यावेळी आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आणुन आपण जिवन जगल पाहिजे.एकमेकांना समजून घेवुन वागल पाहिजे.आचार विचाराच योग्य मार्गक्रमण केलें पाहिजे.प्लाष्स्टिकचा वापर कमी, विजेची बचत,पाण्याची बचत, स्वच्छता, पर्यावरण,अवयव दान ,रक्त दान नेत्र दान ,देहदान दानं विषयी सविस्तर माहिती दिली

मुला मुली मध्ये भेदभाव करू नका
“” स्वस्थ राहा, मस्त रहा,””
“”जगा आणि जगू द्या
आणी शेवटीं
तूकडोजी महाराजांच्या कांहीं पाझिटिव्ह विचार काव्यात्मक सांगितले.
“”पशू पक्षी किट के किती
बघ मेळ करूनी राहती
ती आपत्ती येता कोणती
अती संकटातून धावती
तू मानवाचा देह असुनी
का रे तुझि अशी कल्पना
ऊठा रे पूत्र झडकरी कर सामुदायिक प्रार्थना .!
महिलांना त्यांच्या आवडीच्या गाण्याच्या काही लाईन सकारात्मक विचार कसे ते सांगितले.

दिसते मजला सुख चित्र नवे संसार माझा मांडीते .
जगात पापपुण्य काय आहे तर त्याविषयी मार्गदर्शन केले त्यासाठी त्या म्हणाल्या
, जगत जीवनाचे सार
जाणुनी घ्यावे सत्वर
जगी ज्यांचे कर्म
फळ देईल तोहे ईश्वर.
आणी आपल्या मार्गदर्शनाचा शेवट
“””झाले गेले विसरून जावे पूढपढे चालावे
जिवन गाने गातच राहावे “” अश्या दनदणीत मार्गदर्शनात सर्वच लीन झाले.

🔸पुरोगामी संदेश व पुरोगामी एकता हे दोन्ही साप्ताहिक (प्रिंट), न्युज पोर्टल, ई-पेपर आहेत, या दोन्ही प्रसारमाध्यमा करिता महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहे, सविस्तर माहिती करिता मो. 8605592830 वर संपर्क साधावा- संपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here