Home गडचिरोली महाराष्ट्र अंनिस शाखा गडचिरोली तर्फे सर्प विज्ञान जनजागृती कार्यक्रम

महाराष्ट्र अंनिस शाखा गडचिरोली तर्फे सर्प विज्ञान जनजागृती कार्यक्रम

130

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.9जुलै):– राणी दुर्गावती कन्या शाळा गडचिरोली येथे सकाळी ९.०० वाजता महा.अंनिस जिल्हा शाखेच्या वतीने सर्प विज्ञान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक तथा महा अंनिस चे जिल्हा प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्पमित्र श्री अजय कुकडकर, अतिथी म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, सर्पमित्र श्री सौरभ सातपुते, श्री चेतन शेंडे उपस्थित होते. जिल्ह्यात आढळणाऱ्या विषारी, निम विषारी आणि बिनविषारी सापांविषयी श्री कुकडकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.

श्री सौरभ सातपुते यांनी विषारी साप चावल्यानंतर वेळीच कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे यांनी विज्ञानावर आधारित चमत्काराचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले व सापाविषयी लोकांच्या मनात असलेल्या अंधश्रद्धांविषयीच्या भ्रामक कल्पना सांगून ते दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात ठाकरे सरांनी घराच्या आसपास साप येऊ नयेत यासाठी काय काय उपाययोजना केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक श्री चेतन शेंडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार श्री चुर्हे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वर्गांनी व सर्व वर्गाचे कॅप्टन व उपकॅप्टन यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

🔹पुरोगामी संदेश व पुरोगामी एकता हे दोन्ही साप्ताहिक (प्रिंट), न्युज पोर्टल, ई-पेपर आहेत, या दोन्ही प्रसारमाध्यमा करिता महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहे, सविस्तर माहिती करिता मो. 8605592830 वर संपर्क साधावा- संपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here