✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.8जुलै): – संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातुन पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बांन्शी ग्राम पंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर झाला असुन विभागीय तपासणी समिती दि. ७ जुलै२०२३ रोजी ग्रामपंचायत बांन्सी येथे भेट देऊन संपुर्ण गावाची पाहणी करुन गावातील विविध कार्यालयाची तपासणी केली. मोठ्या उत्साहाने गावातील नागरिकांनी या समितीचे स्वागत केले.
तपासणी करण्यासाठी उपायुक्त (विकास) राजीव फडके (अमरावती विभाग), डाँ विरेंद्र आस्वार वैद्यकिय अधिक्षक यवतमाळ , निलेश दहिकर जिल्हा सरंक्षण अधिकारी महिला व बालकल्याण विभाग अमरावती, सिद्धेश्वर काळुसे सहायक शिक्षण संचालक अमरावती विभाग, चंद्रमोहन कुंभारे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यवतमाळ, नरेंद्र काळबांडे सहायक, विभागीय आयुक्त अमरावती संपुर्ण समिती आली होती.
यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी के. पी. सोनटक्के तालुका आरोग्य अधिकारी डाँ .जय नाईक,महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सखारामजी माने, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, डॉ. विशाल चव्हाण वैद्यकीय अधिकारी चोंढी,अमर राठोड शा.पोषण आहार अधीक्षक, तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे कुशल युवा सरपंच गजानन टाले यांनी केले. तर सुत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी मानले.
यावेळी ग्रा.पं. बांन्शी उपसरपंच रेखा राठोड, सचिव पि. आर .आडे ग्रा.पं. चे सदस्य संतोष आगलावे , अभय ढोणे, माधव डोंगरे, सुनिताबाई लथाड, शोभाबाई आगलावे, मंगलताई शर्मा, इंदुबाई तांबारे, ग्रा.पं कर्मचारी तसेच गावा संबंधित सर्व कर्मचारी मंडळी सर्व गावातील जेष्ठ नागरिक, महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————पुरोगामी संदेश व पुरोगामी एकता हे दोन्ही साप्ताहिक (प्रिंट), न्युज पोर्टल, ई-पेपर आहेत, या दोन्ही प्रसारमाध्यमा करिता महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहे, सविस्तर माहिती करिता मो. 8605592830 वर संपर्क साधावा- संपादक