Home महाराष्ट्र राजकारणातील भीष्मपितामहांनी मध्यम मार्ग काढावा-‘आयएसी’ राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे शरद पवारांना...

राजकारणातील भीष्मपितामहांनी मध्यम मार्ग काढावा-‘आयएसी’ राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे शरद पवारांना आवाहन

80

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.८ जुलै):-देशभरातील तमाम विरोधी पक्षांसाठी जेष्ठ नेते शरद पवार एक आश्वासक चेहरा आणि नेतृत्व आहे.पाच दशकांहून अधिकचा राजकीय अनुभव गाठीशी असलेल्या पवारांनी अनेक संकटावर त्यांच्या विवेकबुद्धीने आणि बुद्धीचार्तुयाने मात केली आहे.अशा या राजकारणातील भीष्मपितामहांनी ओढावलेल्या संकटातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब करावा,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आणि विशेषत: कुटुंबातील कलहामुळे पक्षाची झालेली वाताहत पवारांना रोखता आलेले नाही.राजकीय दुरदृष्टी असलेले पवार त्यांच्या पक्षातील संभाव्य फुटीसंबंधी पुरते गाफील राहील्याचे गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडमोडीवरून दिसून आले आहे.आता एनसीपीची झालेली वाताहत रोखण्याचे महत्वाची जबाबदारी पार पाडण्याचे औदार्य मोठ्या पवारांनाच करावेच लागेल, असे पाटील म्हणाले.

शरद पवार हे देशाचे नेते आहेत.अवघे देश पवारांना ओळखतो. तर, अजित पवार हे राज्याचे नेते आहेत.ते महाराष्ट्रात काम करणारे आहेत.अशात देश आणि राज्यातील नेतृत्वासंबंधी पवारांनी योग्य निर्णय घेतला पर फुटलेला पक्ष त्यांना पुन्हा एकसंघ करता येईल.पवारांना त्यासाठी दोन पावले मागे घ्यावी लागतील,असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले.

पवारांनी राज्याचा नेतृत्वाधिकार अजित पवार आणि देशाचा नेतृत्वाधिकार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले तर,कदाचित हा वाद क्षमवता येईल.अजित पवारांना भाजप सोबत अगोदर पासूनच जायचे होते.मोठ्या पवारांनी देखील त्यांना भाजप सोबत बोलणी करण्याची मोकळीक दिली होती.पंरतु, पहाटेच्या शपथविधीनंतर मोठ्या पवारांच्या राजकीय गुगलीवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची विकेट गेली.आता या उभय नेत्यांच्या युतीमुळे एनसीपीचा त्रिफळा उडाला आहे.अशात शरद पवार अथवा अजित पवार यांच्यापैकी कुणी एकाने तडजोड करीत माघार घेतली पाहिजे आणि एकत्रित काम करीत संभाव राजकीय नुकसान टाळले पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here