✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.7जुलै);- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत असलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वस्तीगृहामध्ये सन 2023-24 करीता प्रवेश घेण्यासाठी फक्त अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्ज प्री मॅट्रिक, कनिष्ठ महाविद्यालय, पदवी, पदविका (डिप्लोमा), पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी 31 जुलैपर्यंतच अर्ज करता येईल.तर मेडिकल व इंजीनियरिंग विद्यार्थ्यांसाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरता येईल.
तसेच खास बाब अंतर्गत प्रवेशाबाबत लोकप्रतिनिधींच्या शिफारशी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत या कार्यालयात सादर करता येतील. त्यानंतर आलेल्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. याबाबत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.