✒️अहमदनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
अहमदनगर(दि.6जुलै);– “शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेमध्ये ६२ नवोदित कथाकारांनी सहभाग नोंदवला होता, यामध्ये ‘झालंर’ ,वैभव रोडे, शेवगाव प्रथम , ‘असे हि रक्षाबंधन ‘ डॉ. शैलजा करोडे, नवी मुंबई द्वितीय तर ‘ ध्येयवेडा ‘ सुजित फलके, सोयगाव जि. औरंगाबाद,तृतीय यांना पारितोषीक जाहिर करण्यात येतं आहेत.” अशी माहिती कथालेखन स्पर्धा प्रमुख बबनराव गिरी यांनी दिली.
पारितोषिक प्राप्त साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तकं व साहित्य संमेलनात सहभाग मिळणार असून उत्तेजनार्थ पारितोषिके रामकृष्ण आघोर,सोलापूर, सुधीर फडके व पी.एन.डफळ, नगर यांना देण्यात येणार आहेत.पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती खजिनदार भगवान राऊत यांनी दिली.
स्पर्धेचे परीक्षण शाहिर भारत गाडेकर,सुनील धस व शर्मिला गोसावी यांनी केले.पारितोषीक प्राप्त साहित्यिकांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी, ज्ञानदेव पांडूळे, प्रा.डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.