Home महाराष्ट्र डोंगरी जन परिषदेच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार

डोंगरी जन परिषदेच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार

82

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6जुलै):-तालुक्यातील शेतकऱ्यांना 2022 च्या खरीप हंगामात जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पाऊस व अतिवृष्टीचे मंजूर झालेले अनुदान पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात यावे या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने दिनांक 17 जुलै बुधवार रोजी मागण्या मान्य नाही झाल्यास तालुक्यातील शेतकरी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज दिनांक 05 जुलै रोजी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आले.

2022 च्या खरीप हंगामात जुलै ते सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे डोंगर भागासह गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले होते परंतु तहसील प्रशासन व राज्यकर्त्याच्या निष्क्रिय पद्धतीमुळे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मधून संपूर्ण तालुका वगळण्यात आला होता त्या विरोधात डोंगरी जन परिषदेच्या वतीने 29 ऑगस्ट 2022 ला प्रशासनाने केलेल्या अन्यायाविरुद्ध धरणे आंदोलन करून प्रशासनास जाब विचारला असता सततच्या पावसात पिकांचे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन तहसील प्रशासनाकडून देण्यात आले होते.

शासनाकडून सततच्या पावसाचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे शासनामार्फत सांगण्यात आले परंतु या वर्षापासून अनुदान वाटपाची प्रक्रिया किचकट पद्धतीची असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अनुदान येण्यासाठी दिपवाळी येऊ शकते म्हणून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेती कामासाठी येणाऱ्या अनुदानाचा उपयोग व्हावा म्हणून नुकसान भरपाईचे अनुदान वाटपाची प्रक्रिया पंधरा दिवसाच्या आत करण्यात यावी तसेच गंगाखेड तालुक्यामध्ये 60 ते 70 टक्के डोंगर भाग असून डोंगर भागातील शेतकऱ्यांचे खरीपाच्या पिकावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असताना डोंगर भागात हारन रोही रानडुक्कर मोर आदी वन्यप्राणी प्रचंड झाले असून वन्य प्राण्यांकडून शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले जात असून वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व वनपरिक्षेत्र कार्यालयाची शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी तक्रार करण्याची वेबसाईट गेल्या वर्षापासून सदर कार्यालयाने बंद ठेवली असल्यामुळे ती साईट चालू करण्यात यावी.

जेणेकरून शेतकऱ्याला वन्य प्राण्यांकडून झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची वन विभागाकडे तक्रार नोंदवता येईल वनपरिक्षेत्र कार्यालयाचा तालुक्यामध्ये एकच कर्मचारी असून त्या कर्मचाऱ्याला थांबण्यासाठी कुठल्याही कार्यालयाची सोय नसल्यामुळे सदर कर्मचाऱ्यास शेतकऱ्यांना शोधीत फिरावे लागते तरी वनपरिक्षेत्र कार्यालयाने गंगाखेड येथे मनुष्यबळ उपलब्ध करून कर्मचाऱ्यांना कार्यालय उपलब्ध करून द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे वेळेवर पंचनामे होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई मिळेल तसेच माकणी पिंपळदरी राणीसावरगाव या महसूल मंडळात महसूल खात्यामार्फत बसवलेली पर्जन्यमापक यंत्राच्या परिसरातील गवत झाडे झुडपे दर आठवड्याला साफसफाई करण्यात यावी.

अशा मागण्यांचे निवेदन डोंगर भागातील शेतकऱ्यांनी डोंगरी जनपरिषदेच्या वतीने आज पाच जुलै 2023 रोजी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी महोदयांना देऊन वरील मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्या तहसीलदार यांना निवेदन देते वेळेस उपस्थित डोंगरी जनपरिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे संयोजक आश्रुबा दत्तराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर बालासाहेब किसनराव मुंडे बंकटराव मुंडे विवेक मुंडे दादासाहेब खांडेकर बालासाहेब रंगनाथ सोडगीर भास्कर सांगळे बाबुराव नागरगोजे शंकर अण्णा रुपनर रतन सिंग सिसोदे गणेश तात्या सिसोदे जगन्नाथ मुंडे भगवान सिसोदे माधव सोन्नर नाथराव सांगळे रमेश शिसोदे गोपीनाथ मुंडे महारुद्र खांडेकर सतीश गवळी नागनाथ गरड विजयकुमार गरड ज्ञानोबा नागरगोजे गोविंद सोडगीर आधी डोंगर भागातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here