Home महाराष्ट्र चैत्यभूमीत गुरू पौर्णिमाच्या निमित्त वर्षावास प्रवचन मालिका व बौद्धाचार्य शिबिर सुरू

चैत्यभूमीत गुरू पौर्णिमाच्या निमित्त वर्षावास प्रवचन मालिका व बौद्धाचार्य शिबिर सुरू

103

🔸वर्षावास प्रवचन मालिका-जिथे शाखा नाहीत तेथे राबवून बौद्ध धम्म घरा घरा पर्यंत पोहचवा

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.6जुलै):-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमराव य आंबेडकर यांनी सकाळी नालासोपारा येथील बुद्ध स्तूप येथे वर्षावासाची सुरुवात करून तमाम बौद्धांना वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्याचे सांगून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या जिथे शाखा नाहीत त्या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिका राबवून तथागत भगवान बुद्धांचा धम्म घरा घरात पोहचवावा असे प्रतिपादन एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ) यांनी जगत गुरू तथागत भगवान बुद्ध यांच्या परंपरेच्या गुरू पौर्णिमेनिमित्त 40 वर्षावास प्रवचन मालिकेचे व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,चैत्यभूमी ,दादर येथे केले.

एस के भंडारे यांनी आवाहन केल्यानुसार आजीवन बौद्ध सभासदासाठी 61 जणांनी नावे मुंबई प्रदेशकडे नोंदविली. यावेळी पहिले प्रवचन भंते ए सुमेध बोधी ( सरचिटणीस, बौद्ध महासभा भिक्खू संघ ) यांचे झाले. या वेळी मुंबई प्रदेश च्यावतीने उत्तम मगरे (अध्यक्ष ,मुंबई प्रदेश ) यांनी भंतेना अष्ट पुरस्कार दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे विलास ढोबळे (उपाध्यक्ष संस्कार ) हे होते. सूत्रसंचालन रविंद्र गवई (सरचिटणीस ,मुंबई प्रदेश ) यांनी केले.

चैत्यभूमीतील या वर्षावास उदघाटन प्रसंगी केंद्राचे बी एच गायकवाड ,अँड एस एस वानखडे ,बी एम कांबळे ,रागिणीताई पवार , महाराष्ट्राचे भिकाजी कांबळे ,विजय कांबळे ,मुंबई प्रदेशचे रविंद्र गवई ,विलास खाडे ,प्रदीप कांबळे,सुनिल बनसोडे आणि सर्व झोन ,विविध शाखा ,केंद्रीय शिक्षक , शिक्षिका,बौद्धाचार्य, सैनिक इत्यादीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. मुंबई प्रदेश च्यावतीने सर्व मान्यवरांचा पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here