वरूड तालुका प्रतिनिधी /
अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ९६ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला अवघ्या तीन ते चार वर्षामध्येच अनेक ठिकाणी भेगा गेल्यामुळे नांदगावपेठ – पांढुर्णा महामार्गाच्या कामातील दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
नवीन राष्ट्रिय महामार्गावरील सिमेंट रोडवर पडलेल्या भेगा मोठया प्रमाणात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर साडेचार-साडेचार मीटर चे असे पॅनल तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण महामार्गावरील शेकडो पॅनलला भेगा गेल्या असल्यामुळे महामार्गावरील रोड खराब झाला आहे. नांदगाव ते पांढुर्णा महामार्गावरील खराब झालेला हा संपूर्ण रस्ता पुन्हा खोदून नव्याने रास्ता तयार करून या महामार्गावरील मोर्शी येथील नळा नदीवरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे दापोरी येथील नदीवरील पुलाच्या अपूर्ण कमामुळे अनेक वाहनांचा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असून नांदगाव मोर्शी वरूड पांढूर्णा महामार्गावरील अर्धवट अपूर्ण असलेल्या धोकादायक पुलांची कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या दोन शहरांसह मध्यप्रदेश व अमरावती शहाराला जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वरुड मोर्शी महामार्गाच्या नूतनीकरनासाठी तब्बल ५३० कोटी खर्च करून या ९६ किलोमीटरच्या नांदगावपेठ – पांढुर्णा महामार्गाचे जेमतेम तीन वर्षांपूर्वी बांधकाम करन्यात आले आहे . मात्र एवढ्या छोट्या कालावधीमध्ये या महामार्गाला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने नांदगावपेठ ते पांढुर्णा महामार्गावरील सिमेंट रस्त्याच्या कामातील दर्जावर आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आधी हा महामार्ग डांबरी रोड चा असल्यामुळे जीवघेने खड्डे पडलेले होते त्यामध्ये अनेक वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागले अपघातातून वाहन चालकांना मुक्तता मिळावी म्हणून या महामार्गचे काम करण्यात आले. परंतु नव्याने तयार करून बांधण्यात आलेल्या ५३० कोटी रुपयांच्या या अमरावती – पांढुरणा महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा गेल्याने झालेल्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे.
नांदगाव पेठ ते मध्यप्रदेशातील पांढुर्णा पर्यंत असलेल्या ९६ किलोमीटरच्या या राष्ट्रीय महामार्गात दोन टप्पे आहे. पहिला टप्पा नांदगाव पेठ ते मोर्शी हा ४३ किलोमीटर लांबीचा टप्पा असून यासाठी शासनाने तब्बल २४० कोटी रुपये खर्च करण्यात आले तसेच दुसरा टप्पा हा मोर्शी ते पांढुरणा पर्यंत आहे या ५३ कीलोमीटर लांबीच्या कामासाठी तब्बल २९० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे परंतु या दोन्ही टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी सिमेंट रोडला भेगा पडल्यामुळे रोड मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे. नागरिकांनी नाईक वेळा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे व संबंधित कंत्राटदाराकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा त्याची दखल कोणीही घेत नसून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराच्या दावणीला बांधला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
नांदगावपेठ – पांढुर्णा राष्ट्रिय महामार्गाकरिता ५३० कोटी रुपये उपलब्ध करून नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुरणा या रस्त्याचे काम करण्यात आले मात्र ठेकेदाराच्या व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होऊन अनेक पूलांची कामे अर्धवट आस्थेत आहे या महामार्गाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळे महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडत आहे या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे — देवेंद्र भुयार आमदार मोर्शी विधानसभा .