✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी (दि. 4 जुलै):- भु-वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडीचे संचालक तथा मार्गदर्शक आदरणीय सुबोधदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदेव भक्ताचे प्रेरणास्थान असलेले भु-वैकुंठ आत्मानुसंधार अड्याळ टेकडी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाला चंद्रपूर,, भंडारा, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातील शेकडो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली होती.
सकाळी सामुदायिक ध्यान, सफाई, श्रमदान नंतर 10 वाजता सर्वांनी भोजन केले.11 वाजता रामधुनला सुरुवात करून त्याद्वारे गुरुपद गुंफा व कर्मयोगी संत पू तुकाराम दादांच्या महासमाधी ची पूजा करण्यात आली.त्यानंतर कार्यक्रमात तलमले महाराज, आशाताई साठोने, पोलिस पाटील बागमारे ताई प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते.
भजन , संकल्प, भाषण द्वारा अनेक लोकांनी गुरूला आपली संकल्प पुष्प समर्पित केले. सुश्री रेखाताई यांची प्रास्ताविक भाषण केले. गोकुळ भाऊ पानसे यांनी ग्रामसभा वर गीत सादर केले. समारोपात श्री सुबोध दादांनी गुरु, गुरुपौर्णिमा, गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान, गुरुकुल विशेष महात्म्य सत्संग व सोबतच कार्याचा अहवाल सादर केला. यावर्षी छिन्दवाडा (मध्य प्रदेश), कोल्हापूर, चंद्रपूर जिल्ह्यातील आठ नवीन विद्यार्थ्यांनी भु- वैकुंठ अड्याळ टेकडी येथील जीवन शिक्षण अध्यात्म गुरुकुल मध्ये प्रवेश घेतला त्याबाबत दादांनी त्यांचा सर्वांना परिचय करून दिला. सर्व भक्तांनी त्यांचे या भु वैकुंठ अड्याळ टेकडी परिवारात शब्दसुमन व टाळ्यांनी स्वागत व अभिनंदन केले. कर्मयोगी तुकाराम दादांचे गुरुकुल चे स्वप्न मोठे होताना पाहून सर्व लोकांना अत्यंत आनंद झाला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. नवलाजी मुळे यांनी केले. दरवर्षी प्रमाणे श्रीमती उषाताई नारखेडे यांच्या परिवार तर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे संपूर्ण अन्नदान करण्यात आले.कार्यक्रम नंतर दरवर्षी प्रमाणे गट क्रमांक 19 मधील शेतीत सर्व गुरुदेव भक्तांच्या श्रमदानातून धानाची पेरणी करण्यात आली.श्रमदान श्रेष्ठदान या अड्याळ टेकडीच्या सिद्धांताला धरून सर्व गुरुदेव भक्त दरवर्षी शेतीत श्रमदान करतात आणि यावर्षी सुद्धा केले.