Home महाराष्ट्र माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते आक्सापुर आणि पवनपार येथे शोकसभा मंच...

माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते आक्सापुर आणि पवनपार येथे शोकसभा मंच कामांचे भूमिपूजन संपन्न

89

🔹भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे यांची प्रमुख उपस्थिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.4 जुलै):-ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे हस्ते आक्सापुर आणि पवनपार येथे जन सुविधा अंतर्गत मंजूर स्मशानभूमीत शोकसभा मंच कामांचे प्रत्येकी 10 लाख रुपये किंमतीचे बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, तालुकाध्यक्ष, भाजयुमो ब्रह्मपुरी,तथा माजी सभापती रामलाल महादेव दोनाडकर,भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्रेमलालभाऊ धोटे,भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष समाजशास्त्रज्ञ प्रा. डा. अशोक सालोटकर,भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, भाजपा अनुसूचित जाती जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी चुमदेव कारूजी जांभूळकर, विलास वाकुडकर तालुकाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा ब्रह्मपुरी तालुका, द्यानेश्वर पा. दिवटे महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य द्यानेश्वर भोयर, रोशन भाऊ नवघडे इ.भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच सरपंचा निराशाताई अनील तोंडफोडे, सौ.शारदाताई वाकुडकर उपसरपंचा, दिलीप कन्नाके ,ग्रा. पं. सदस्य,प्रवीण पंचभाई ग्रा.पं. सदस्य यांचेसह गावांतील प्रतिष्ठित नागरिक देविदास पा. झोडे,पो.पा. तथा अनील भाऊ तोंडफोडे,दुधरामजी कापगते, चरणदास मेश्राम, श्रीहरी भोयर, इ. मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here